Indian Railway Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: दिवाळीत प्रवाशांचे बल्ले-बल्ले, रेल्वेत मिळणार मोफत जेवण!

Indian Railways Free Meal: दिवाळीत तुम्हीही घरी जाण्याचा प्लान करत असाल तर करोडो प्रवाशांना रेल्वेने खूशखबर दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Railways News: दिवाळीत तुम्हीही घरी जाण्याचा प्लान करत असाल तर करोडो प्रवाशांना रेल्वेने खूशखबर दिली आहे. आतापासून तुम्हाला ट्रेनमध्ये मोफत जेवणाची सुविधा मिळणार आहे. होय... जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करणार असाल तर तुम्हाला जेवणासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या ट्रेनमध्ये आणि कोणत्या परिस्थितीत तुम्हाला मोफत जेवणाची सुविधा मिळेल.

मोफत जेवण

जर तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल, तर IRCTC कडून तुम्हाला मोफत जेवण तसेच थंड पेय आणि पाण्यासाठी कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत, परंतु तुमच्या ट्रेनला उशीर झाला असेल तरच याचा फायदा घेता येणार आहे. हे जेवण तुम्हाला IRCTC कडून अगदी मोफत दिले जाते.

तुम्ही मोफत सुविधेचा आनंद घेऊ शकता

या प्रकरणात, आपल्याला काहीही विचार करण्याची आवश्यकता नाही. रेल्वेच्या अशा सुविधांचा तुम्ही सहज आनंद घेऊ शकता. तो तुमचा अधिकार आहे. भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) नियमांनुसार, जेव्हा ट्रेन उशीरा असते तेव्हा प्रवाशांना IRCTC च्या कॅटरिंग पॉलिसी अंतर्गत नाश्ता आणि हलके जेवण दिले जाते.

ही सुविधा कधी उपलब्ध होणार?

आयआरसीटीसीच्या नियमांनुसार प्रवाशांना फ्री मीलची सुविधा दिली जाते. ही सुविधा तुम्हाला तेव्हा दिली जाते, जेव्हा तुमची ट्रेन 2 तास किंवा त्याहून अधिक उशिरा असते. एक्स्प्रेस ट्रेनमधील प्रवाशांना ही सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अत्यंत उपयुक्त ठरु शकते.

यासोबतच, ट्रेनमध्ये तुम्हाला चहा-कॉफी आणि बिस्किटेही नाश्त्यामध्ये मिळतात. संध्याकाळचा नाश्ता, चहा किंवा कॉफी आणि चार ब्रेड स्लाइसबद्दल बोलतांना बटर चिपोटल दिले जाते. याशिवाय दुपारच्या वेळी प्रवाशांना रोटी, डाळी, भाजी आदी मोफत मिळतात. कधी कधी ते पूर्णही दिले जाते. जर तुमची ट्रेन 2 तास उशिराने धावत असेल, तर 2 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास तुम्ही नियमानुसार जेवण ऑर्डर करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

SCROLL FOR NEXT