Indian Railways: वंदे भारतच्या धर्तीवर सुरु होणार हाय-स्पीड मालगाडी

Semi High Speed Train: रेल्वेकडून प्रथम मुंबई-अहमदाबाद मार्गावर जलदगती मालगाडी सुरु करण्याची तयारी सुरु आहे.
Vande Bharat Train
Vande Bharat TrainDainik Gomantak
Published on
Updated on

Vande Bharat Train: प्रवाशांची सोय लक्षात घेऊन सेमी हायस्पीड वंदे भारत सुरु केल्यानंतर आता भारतीय रेल्वे हायस्पीड मालगाड्या सुरु करण्याचा विचार करत आहे. रेल्वेकडून प्रथम मुंबई-अहमदाबाद मार्गावर जलदगती मालगाडी सुरु करण्याची तयारी सुरु आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेला अल्पावधीतच उच्च मूल्याची वाहतूक बाजारपेठ काबीज करायची आहे. सध्या, रेल्वे इतर मार्गांनी जाणाऱ्या पार्सल व्यवसायात आपली पकड मजबूत करण्याच्या योजनेवर काम करत आहे.

Vande Bharat Train
Vande Bharat Train: PM मोदी उद्या देशाला देणार मोठी भेट, या मार्गावरही धावणार वंदे भारत एक्सप्रेस

160 किमी ताशी वेग

वंदे-भारत प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या नवीन 'फ्रेट ईएमयू रोलिंग स्टॉक'च्या माध्यमातून ही सेवा नियोजित असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. बातमीनुसार, ही सेवा लवकरात लवकर सुरु करण्याचा रेल्वेचा विचार आहे. फ्रेट EMU रेकच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये 160 किमी प्रतितास हा त्याचा टॉप स्पीड समाविष्ट आहे. रेक पॅलेटाइज्ड कंटेनर वाहतुकीसाठी डिझाइन केले जात आहे.

'मेक इन इंडिया'ची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून

ही हायस्पीड मालवाहतूक ट्रेन अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल. डब्यांना 1,800 मिमी रुंदीचे स्वयंचलित स्लाइडिंग प्लग दरवाजे असतील. दिल्ली ते मुंबई सुरु होणाऱ्या या मालगाडीमध्ये पंतप्रधान मोदींचे ‘मेक इन इंडिया’ व्हिजन डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

Vande Bharat Train
Vande Bharat Train Accident: आधी म्हैस अन् आता गाय, वंदे भारत ट्रेनचा 2 दिवसांत दुसरा अपघात

याआधी, रेल्वे प्रवाशांना चार मार्गांवर वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी हिमाचल प्रदेशला वंदे भारत एक्सप्रेस दिली आहे. पंतप्रधानांनी राजधानी दिल्लीसाठी उना येथील अंब अंदौरा रेल्वे स्थानकावरुन देशातील चौथ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे.

Vande Bharat Train
खूशखबर! Vande Bharat Train मधून प्रवास करत असाल तर द्यावे लागणार इतके भाडे

यावेळी, त्यांच्यासोबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर देखील होते. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी गांधीनगर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस 2.0 ला हिरवा झेंडा दाखवला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com