Railway Minister Ashwini Vaishnaw  Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: करोडो रेल्वे प्रवाशांना अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी भेट, ट्रेनमध्ये मोफत मिळणार...

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांसाठी खूशखबर आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर आता तुम्हाला रेल्वेकडून विशेष सुविधा मिळणार आहे.

Manish Jadhav

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्या करोडो प्रवाशांसाठी खूशखबर आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर आता तुम्हाला रेल्वेकडून विशेष सुविधा मिळणार आहे.

रेल्वे प्रवाशांना वेळोवेळी अनेक मोफत सुविधा देत असते. माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आता प्रवाशांना ट्रेनमध्ये मोफत जेवण मिळणार आहे.

तुम्हीही ट्रेनमध्ये प्रवास करणार असाल तर आता तुम्हाला जेवणही मोफत मिळणार आहे. रेल्वेकडून कोणत्या प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नवीन नियम जारी केले

नवीन नियमानुसार रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला जेवणासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. रेल्वेकडून प्रवाशांना (Passengers) सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. पण यावेळी आम्ही तुम्हाला अशाच एका सुविधेबद्दल सांगत आहोत, ज्याचा तुम्ही अनेकदा फायदा घेत नाही. जाणून घेऊया-

ट्रेनच्या विलंबाचा फायदा मिळेल

भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) प्रवास करणाऱ्यांना अनेकवेळा ट्रेनची प्रतीक्षा करावी लागते. ट्रेन आपल्या वेळेपासून बर्‍याच वेळा उशिरा येते, परंतु आता जर तुमची ट्रेन लेट झाली तर तुम्हाला रेल्वेकडून मोफत जेवणाची सुविधा मिळणार आहे. रेल्वे काही खास प्रवाशांना मोफत जेवणाची सुविधा देत आहे.

जाणून घ्या IRCTC चा नियम काय आहे?

आयआरसीटीसीच्या नियमानुसार प्रवाशांना फ्री माईलची सुविधा दिली जाते. जेव्हा तुमची ट्रेन 2 तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीर होते तेव्हा तुम्हाला ही सुविधा दिली जाते.

एक्स्प्रेस ट्रेनमधील प्रवासीच या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी खूप उपयुक्त ठरु शकते.

ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्येही सुविधा उपलब्ध असेल

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाइन वेबसाइटवरुन तिकीट बुक करणाऱ्यांनाही ही सुविधा देण्यात आली आहे.

कोणत्याही कारणामुळे तुमची ट्रेन चुकली तरी तुम्हाला परतावा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला TDR फॉर्म भरावा लागेल आणि ट्रेन स्टेशनवरुन सुटल्यानंतर 1 तासाच्या आत तिकीट काउंटरवर जमा करावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT