Vaishno Devi Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी मोठी अपडेट, रेल्वेने आणली खास योजना; आता तुम्हाला...

Vaishno Devi Yatra: तुम्हीही वैष्णोदेवीला जाण्याचा विचार करत असाल तर रेल्वेकडून एक खास सुविधा सुरु करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Indian Railways: वैष्णोदेवी यात्रेला जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही वैष्णोदेवीला जाण्याचा विचार करत असाल तर रेल्वेकडून एक खास सुविधा सुरु करण्यात आली आहे.

आता तुमच्यासाठी वैष्णोदेवीचे दर्शन घेणे आणखी सोपे झाले आहे. तुम्हीही मातेच्या दर्शनासाठी जात असाल, तर रेल्वेने एक खास सुविधा (Railways Tour Package) सुरु केले आहे, ज्यामध्ये रेल्वे तुम्हाला मातेचे दर्शन देत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये तुम्हाला राहण्या-खाण्याच्या सोयीसाठी वेगळा काही खर्च करावा लागणार नाही.

पॅकेजचे नाव - हरिद्वार आणि ऋषिकेशसह माता वैष्णोदेवी (SCZBG05)

प्रवासाचा कार्यक्रम - सिकंदराबाद - आग्रा (Agra) - मथुरा - वृंदावन - कटरा - हरिद्वार - ऋषिकेश - सिकंदराबाद

प्रवासाची खास संधी

या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला आग्रा, हरिद्वार, मथुरा, ऋषिकेश, वैष्णो देवी, वृंदावन येथे जाण्याची संधी मिळेल. यासोबतच हे पॅकेज 8 दिवस आणि 9 रात्रीसाठी असेल. 10 जून 2023 पासून तुम्ही या टूर पॅकेजमध्ये प्रवास (Travel) करु शकता.

डबल शेअरिंगसाठी किती खर्च येईल?

रेल्वेने या पॅकेजची 3 श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. यामध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये डबल शेअरिंगसाठी प्रति व्यक्ती 15435 रुपये मोजावे लागतील. स्टँडर्ड क्लासमध्ये डबल शेअरिंगसाठी प्रति व्यक्ती 24735 रुपये, कंफर्ट क्लास डबल शेअरिंगसाठी प्रति व्यक्ती 32480 रुपये.

मुलांचे भाडे किती असेल?

मुलांबद्दल बोलायचे झाल्यास, 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी, इकॉनॉमीमध्ये प्रति मुल 14430 रुपये, स्टॅंडर्ड क्लाससाठी प्रति बालक 23555 रुपये, कंफर्ट क्लाससाठी प्रति चाइल्ड 31060 रुपये खर्च येईल.

मोफत दुपारचे जेवण

या पॅकेजमध्ये तुम्हाला सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. यासोबतच ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT