Vaishno Devi Dainik Gomantak
अर्थविश्व

Vaishno Devi: वैष्णोदेवीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर, रेल्वेने सुरु केली नवी सुविधा; आता फक्त...

Vaishno Devi Train: रेल्वेकडून प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरु करण्यात आली असून, त्यानंतर अवघ्या काही तासात तुम्ही वैष्णोदेवीला पोहोचाल.

Manish Jadhav

Indian Railways: तुम्हीही वैष्णोदेवीला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेकडून प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरु करण्यात आली असून, अवघ्या काही तासात तुम्ही वैष्णोदेवीला पोहोचाल.

यासह, तुम्ही तुमचा प्रवास 4 तास अगोदर पूर्ण कराल. जर तुम्हाला पूर्वी प्रवास करण्यासाठी 10 तास लागायचे, तर आता तुमचा प्रवास अवघ्या 6 तासात पूर्ण होईल. आता तुम्ही वैष्णोदेवीला सहज कसे पोहोचू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वैष्णोदेवीला 8 तासात पोहोचाल

रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन वंदे भारत गाड्या सुरु केल्या आहेत. या गाड्यांद्वारे तुम्ही काही तासांत लांबचे अंतर कापू शकता. दिल्ली ते कटरा हे अंतर सुमारे 655 किलोमीटर आहे आणि तुम्ही हे अंतर फक्त 8 तासांत कापता.

ट्रेनचे टाइम टेबल काय आहे?

वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेबद्दल सांगायचे झाल्यास, तुमची ट्रेन सकाळी 6 वाजता दिल्लीहून (Delhi) कटरासाठी निघेल. तुम्ही दुपारी 2 वाजता तिथे पोहोचाल. कटरा येथे पोहोचण्यापूर्वी ही ट्रेन अंबाला, लुधियाना आणि जम्मू तावी येथे 2-2 मिनिटे थांबेल.

ही ट्रेन जम्मू तावीला 12:38 वाजता पोहोचते आणि त्याच दिवशी दुपारी 3 वाजता कटराहून निघून रात्री 11 वाजता दिल्लीला पोहोचते. ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस चालते.

भाडे किती असेल?

जर ट्रेनच्या भाड्याबद्दल बोलायचे झाल्यास, तर तुम्ही दिल्ली ते वैष्णोदेवीला जाण्यासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग देखील करु शकता. AC चेअर कारसाठी तुम्हाला 1545 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये मूळ भाडे 1039 रुपये आहे.

त्याचवेळी, 364 रुपये कॅटरिंग शुल्क, 57 रुपये जीएसटी, 40 रुपये आरक्षण शुल्क आणि 45 रुपये सुपरफास्ट शुल्काच्या रुपात आहेत. दुसरीकडे, जेवणाची सुविधा घ्यायची नसेल तर केटरिंगचे शुल्क भरावे लागणार नाही.

एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी किती शुल्क आकारले जाते?

याशिवाय, एक्झिक्युटिव्ह चेअर कारच्या भाड्याबद्दल बोलायचे झाल्यास, ते 3055 रुपये आहे. यामध्ये मूळ भाडे 2,375 रुपये, खानपान शुल्क 419 रुपये, जीएसटी (GST) 126 रुपये, आरक्षण शुल्क 60 रुपये आणि सुपरफास्ट शुल्क 75 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

Davorlim: फ्लॅटमध्ये राहायचे 20 जण, चालायचा बेकायदेशीर मदरसा; रुमडामळ-दवर्लीत 17 अल्‍पवयीन मुलांची सुटका

Goa Opinion: गोव्यात मूलभूत सोयीसुविधा ज्या दिवशी निष्पक्षपणे मिळतील, तेव्हा ‘रामराज्य’ आले असे म्हणता येईल

Goa Live News: गोवा टॅक्सी संघटनांनी जुंता हाऊस येथे केला मूक निषेध

Police Attacks Goa: सामान्यांसाठी पोलिसी खाक्या, माफियांसमोर हुजरेगिरी; बेतूल, वास्कोत 'सिंघम'वर झालेले हल्ले

SCROLL FOR NEXT