Indian Railway  Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railway: चुकूनही 'या' 5 चुका करू नका, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

Indian Railway Rule: तुम्ही भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल तर हे पाच नियम माहिती असणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील बहुतेक लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेकडून (Railway) अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. यासोबतच प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी काही नियम ही करण्यात आले आहेत. जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केले किंवा नकळत चूक केली, तर तुम्हाला पेनल्टी भरावा लागू शकतो. तुम्ही जर या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. हे नियम जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.

रेल्वेच्या नियमांनुसार जर कोणी विनापरवाना रेल्वे किंवा रेल्वेच्या परिसरात माल विकला किंवा फेरी मारला तर तो गुन्हा मानला जाईल. असे केल्यावर भारतीय रेल्वे नियमाच्या कलम 144 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. दोषी आढळल्यास 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 2 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

  • दुसऱ्या डब्यात प्रवास करण्यास परवानगी नाही

अनेक वेळा असे घडते की काही लोक आपली जागा सोडून इतर डब्यातून आपल्या कुटुंबीय किंवा मित्रांसह प्रवास करतात. त्या व्यक्तीवर रेल्वे कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते आणि लांब पल्ल्याच्या भाड्यासह 250 रुपये दंड देखील आकारला जाऊ शकतो.

  • ब्लॅक तिकीटची विक्री

रेल्वेद्वारे तिकीटांची विक्री फक्त नोंदणीकृत काउंटर किंवा अधिकृत एजंटद्वारे केली जाते. अशा परिस्थितीत जर कोणी प्रवाशाला परवानगीशिवाय तिकीट विकले तर त्याला 10,000 रुपये दंड आणि रेल्वे कायद्याच्या कलम 143 नुसार 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

  • वेटिंग तिकीट किंवा ट्रेन रद्द करून प्रवास

रेल्वे वेटिंग तिकिटावर प्रवास करू देत नाही. तिकिट कन्फर्म असेल तरच प्रवास करता येतो. तसेच जर ट्रेन रद्द केली गेली असेल तर त्या तिकिटावर दुसऱ्या ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी नाही. जर कोणी असे केले तर, TTE तुमच्याकडून तिकिटाच्या रकमेसह संपूर्ण भाडे आकारते. दंड 250 रुपये असू शकतो आणि TTE तुम्हाला पुढच्या स्टेशनवर देखील सोडू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT