Vaishno Devi Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: नवरात्रीत वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांसाठी खूशखबर, रेल्वेने दिली 'ही' आनंदाची बातमी!

IRCTC Latest News: जर तुम्हीही यावेळी चैत्र नवरात्रीत वैष्णोदेवीला जाण्याचा विचार करत असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे.

Manish Jadhav

IRCTC Latest News: वैष्णोदेवीच्या करोडो भक्तांना रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. जर तुम्हीही यावेळी चैत्र नवरात्रीत वैष्णोदेवीला जाण्याचा विचार करत असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे.

चैत्र नवरात्री (Navratri 2023) 22 मार्चपासून सुरु होत आहे आणि त्यानिमित्त लाखो लोक मातेच्या दर्शनासाठी जातात. रेल्वेने आता कोणता विशेष उपक्रम सुरु केला आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत-

वैष्णोदेवीसह या मातांचे दर्शन घेण्याची संधी मिळेल

आयआरसीटीसीने (IRCTC) सांगितले की, यावेळी वैष्णोदेवीच्या दर्शनासोबतच तुम्हाला कांगडा देवी, ज्वाला जी, माँ चामुंडा आणि चिंतापूर्णीलाही भेट देण्याची संधी मिळेल. रेल्वेने एक खास टूर पॅकेज काढले असून त्याअंतर्गत तुम्ही सहज मातेचे दर्शन घेऊ शकता.

दिल्लीहून प्रवास करता येतो

रेल्वेने (Railway) 5 देवींच्या दर्शनासाठी खास टूर पॅकेज काढले आहे. यामध्ये तुम्हाला थर्ड एसी तसेच स्लीपर क्लासमध्ये बुकिंग करण्याची संधी मिळेल. तुम्ही 22 मार्च आणि 29 मार्चसाठी बुक करु शकता. ही ट्रेन जयपुरे येथून धावेल, परंतु तुम्ही ती गुडगाव, दिल्ली कॅंट, दिल्लीसह (Delhi) अनेक स्थानकांवरुन पकडू शकता.

भाडे किती येणार?

यामध्ये क्लासनुसार भाडे वेगवेगळे असेल. तुम्ही 5 लोकांसोबत प्रवास केल्यास स्लीपर क्लाससाठी प्रति व्यक्ती 10,740 रुपये मोजावे लागतील. तर, सिंगल शेअरिंगसाठी 14,735 रुपये, डबल शेअरिंगसाठी 11,120 रुपये मोजावे लागतील.

अधिकृत लिंक तपासा

या पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=NJR044 या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Third District: गोव्यात तिसरा जिल्हा झाल्यावर 'सरकारी कामे' वेळेत होणार का? की नोकऱ्यांत ओळखीची लोकं घुसणार..

Rapan Fishing: चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओढली रापण! होडी खेचून आणली किनाऱ्यावर; शाळेचा अभिनव उपक्रम

Government Job: लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडी आणि गोंधळ! 100 पदांसाठी हजारोंची गर्दी, तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत

Goa: गोव्याच्या विद्यार्थिनीचा आवाज घुमला राजस्थानात! 'वनिष्ठा'चे युवा संसदेत प्रतिनिधित्व; दहशतवादावर मांडले परखड विचार

Ganesh Idol: स्वतः 'गणेशमूर्ती' तयार करण्याचा आनंद वेगळाच! शिल्पकलेची कार्यशाळा

SCROLL FOR NEXT