Ashwini Vaishnaw Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट; ज्येष्ठ नागरिकांसाठी भाडे सवलत चार वर्षांनी होणार बहाल?

Senior Citizens Ticket Concession: भाडे शिथिल करण्याबाबत घोषणा केल्यास, मोदी 3.0 सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात मोठी भेट असेल.

Manish Jadhav

जर तुमच्या कुटुंबात ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तुम्ही स्वतः या श्रेणीत येत असाल आणि रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. होय, कोरोना महामारीच्या काळात रेल्वेने बंद केलेली भाडे सवलत सरकार पुन्हा सुरु करु शकते.

तसे झाल्यास करोडो ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळू शकतो. सरकारने ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) रेल्वे भाड्यात दिलेली सवलत चार वर्षांनंतर पुन्हा लागू केली जाऊ शकते. भाडे शिथिल करण्याबाबत घोषणा केल्यास, मोदी 3.0 सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात मोठी भेट असेल.

चार वर्षांनी भाडे सवलत बहाल होण्याची शक्यता

दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मोदी 3.0 सरकार अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यातील सवलत चार वर्षांनंतर बहाल केली जाऊ शकते. एसी कोचऐवजी केवळ स्लीपर क्लाससाठी ही सूट बहाल करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे.

रेल्वेवर किमान आर्थिक भार टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत स्लीपर क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच भाड्यात सवलत दिली जाईल.

याशिवाय, रेल्वे भाड्यात सवलत ज्या ज्येष्ठ नागरिकांना घ्यायची आहे त्यांनाच मिळेल, असेही या बातमीत सांगण्यात आले. म्हणजेच, जर तुम्ही तुमचे वय पूर्वीप्रमाणे प्रविष्ट केले तर तुम्हाला रेल्वेच्या या सुविधेचा लाभ मिळणार नाही.

आता ज्येष्ठ नागरिकांना तिकीट काढताना आरक्षण फॉर्ममध्ये सर्व कॉलम भरावे लागणार आहेत. प्रत्येक प्रवाशाला वर्षातून दोन-तीन वेळा ही सवलत देण्याचा विचार केला जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. प्री-कोविड नियमांनुसार, ज्येष्ठ नागरिकांना जनरल, एसी आणि स्लीपर कोचमधून प्रवास करण्यावर 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली होती.

भाड्यात 40% सूट देण्यात आली

कोविडपूर्वी, रेल्वे 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांसाठी मूळ भाड्यात 40% सूट देत असे. याशिवाय 58 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांना भाड्यात 50% सूट देण्यात आली आहे. मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात ही सूट बंद करण्यात आली होती.

रेल्वेने दिलेल्या भाडे सवलतीचा मुद्दाही संसदेत उपस्थित करण्यात आला होता. यावर रेल्वेचे म्हणणे आहे की, प्रवासी भाड्यात 59,837 कोटी रुपयांची सबसिडी आधीच दिली जात आहे. एका प्रवाशाला सरासरी 110 रुपये खर्च येतो, त्या तुलनेत केवळ 45 रुपये आकारले जातात, असे सांगण्यात आले.

रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ

अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, कोरोना महामारीनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे प्रवासात वाढ झाली आहे. कनिष्ठ सभागृहात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती देताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले होते की, 20 मार्च 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत 1.87 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. तर 1 एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान 4.74 कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला.

त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सूट बहाल करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र आता सरकार पुन्हा त्याची अंमलबजावणी करण्याच्या विचारात असल्याची बातमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT