Indian Railways  Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात मिळणार सवलत! रेल्वेमंत्र्यांनी सांगितला नवा नियम

IRCTC: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या वतीने राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात असे सांगण्यात आले की, रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांची सवलत बहाल करु शकते.

Manish Jadhav

Ticket Concesation: भारतीय रेल्वे पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यातील सवलत बहाल करु शकते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या वतीने राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात असे सांगण्यात आले की, रेल्वे लवकरच ज्येष्ठ नागरिकांची सवलत बहाल करु शकते.

रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात दिलेली सवलत कोविडमुळे थांबवण्यात आली होती. रेल्वेमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले की, भारतीय रेल्वेने 2019-20 मध्ये प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे.

स्लीपर आणि एसी 3 मध्ये सवलत पुनरावलोकन असेल!

त्यांनी असेही सांगितले की, 59,837 कोटी रुपयांची सबसिडी (Subsidy) प्रत्येक प्रवासी व्यक्तीसाठी सरासरी 53% सवलत आहे.

काही महिन्यांनंतर, संसदीय समितीने शिफारस केली की ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकिटावरील सवलत पुनर्संचयित करावी. सवलतीबाबत सरकारची भूमिका काय, असा लेखी प्रश्न रेल्वेमंत्र्यांना विचारण्यात आला.

रेल्वेच्या स्थायी समितीने ज्येष्ठ नागरिकांना स्लीपर आणि एसी 3 मध्ये सवलत देण्याचा आढावा घेण्याचा आणि विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

59,837 कोटी रुपये अनुदान दिले

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, 2019-20 मध्ये प्रवाशांच्या तिकिटांवर 59,837 कोटी रुपयांची सबसिडी देण्यात आली होती.

रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही सरासरी 53% सवलत आहे. हे अनुदान सर्व प्रवाशांसाठी सुरु आहे. दिव्यांग, विद्यार्थी (Students), रुग्ण अशा अनेक श्रेणींसाठी या अनुदानाच्या रकमेतून अधिकाधिक सवलती सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वेने 23 मार्च 2020 पासून सर्व प्रवासी गाड्यांचे संचालन बंद केले होते.

दुसरीकडे, संसदीय समितीच्या आवाहनावर रेल्वे मंत्रालयाने विचार केल्यास ज्येष्ठ नागरिकांसाठीची सूट पुन्हा बहाल केली जाऊ शकते.

तथापि, डिसेंबर 2022 मध्ये, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, तिकिट भाड्यात सवलत सध्या पुनर्संचयित केली जाऊ शकत नाही. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले होते की, रेल्वेचे पेन्शन आणि पगाराचे बिल खूप जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्ध्या तासाच्या पावसानं मालपेतील रस्त्यांना ओहळाचे स्वरूप; वाहनचालकांचा खोळंबा; निचरा व्यवस्था नसल्याने समस्या

मुसळधार पावसाचा तडाखा! आके येथील गृहनिर्माण वसाहतीची संरक्षक भिंत कोसळली; परिसरात भीतीचं वातावरण

NSUI Law Students: 'कायदा'च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या! 'एनएसयूआय'ची मागणी; कुलगुरूंकडून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT