Railways Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: ट्रेनमधील खाद्यपदार्थांबाबत मोठी अपडेट, रेल्वे मंत्रालयाने जारी केला नवा आदेश

Indian Railways Satvik Food Service: ट्रेनमधील लांबच्या प्रवासात अनेकदा प्रवाशांसमोर खाण्यापिण्याची समस्या निर्माण होते.

दैनिक गोमन्तक

Indian Railways Satvik Food Service: ट्रेनमधील लांबच्या प्रवासात अनेकदा प्रवाशांसमोर खाण्यापिण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळेच अनेकदा लोक घरी शिजवलेले अन्न घेऊन जाताना दिसतात. पण ज्यांना कोणत्याही कारणाने ते जमले नाही त्यांचे काय? होय, शुद्ध शाकाहारी जेवण घेणाऱ्यांसाठी रेल्वेकडून नवीन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. तुमच्यासोबतही अशीच समस्या असेल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंदित करेल. रेल्वे मंत्रालयाच्या नव्या आदेशानंतर आता प्रवाशांना प्रवासादरम्यान पूर्णपणे सात्विक भोजन मिळणार आहे.

सात्विक भोजन प्रवाशांच्या सीटपर्यंत पोहोचेल

भारतीय रेल्वेची (Indian Railways) उपकंपनी असलेल्या IRCTC ने प्रवासादरम्यान प्रवाशांना सात्विक भोजन देण्यासाठी इस्कॉनशी करार केला आहे. याअंतर्गत, सात्विक भोजन खाणाऱ्या प्रवाशांना इस्कॉन मंदिराच्या गोविंदा रेस्टोरंटमधून जेवण ऑर्डर केल्यानंतर त्यांच्या जागेवर पोहोचवले जाईल. आयआरसीटीसी आणि इस्कॉन यांच्यातील या करारानुसार, ही सेवा सध्या दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावर उपलब्ध आहे.

प्रवाशांना त्रास होणार नाही

ही सुविधा सुरु करण्याच्या निमित्ताने रेल्वे बोर्डाकडून सांगण्यात आले की, काही प्रवासी (जे सात्विक अन्न खातात) ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या शुद्धतेबाबत शंका घेतात. लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांसोबत हे अनेकदा दिसून आले आहे. असे अनेक प्रवासी आहेत, जे कांदा-लसूणही खात नाहीत. ते प्रवासी पँट्री कारमधून मिळणारे खाद्यपदार्थ टाळतात. मात्र ही सुविधा सुरु झाल्यानंतर अशा प्रवाशांना (Passengers) कोणतीही अडचण येणार नाही.

अशा प्रकारे या सेवेचा लाभ घ्या

जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला रेल्वे प्रवासादरम्यान सात्विक अन्न घ्यायचे असेल, तर तुम्हाला IRCTC ई-कॅटरिंग वेबसाइट किंवा फूड ऑन ट्रॅक अॅपवर जेवण बुक करावे लागेल. यासाठी तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या किमान दोन तास आधी पीएनआर क्रमांकासह ऑर्डर करावी लागेल. ऑर्डर फायनल झाल्यानंतर, जेवण तुमच्या सीटवर पोहोचेल. गोविंदा रेस्टॉरंटद्वारे दिल्या जाणाऱ्या जेवणात प्रवाशांना जुन्या दिल्लीची व्हेज बिर्याणी, डिलक्स थाळी, महाराजा थाळी, दाल मखनी, पनीर डिशेस, नूडल्स आणि इतर सात्विक पदार्थ मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT