Indian Railways Hospital Train
Indian Railways Hospital Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways Hospital Train: जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन भारतात; उपचारापासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्व काही रेल्वेतच...

Manish Jadhav

World's First Mobile Hospital: भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे, ज्याद्वारे 40 दशलक्ष लोक दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. लोकांना रोजगार देण्याच्या बाबतीत भारतीय रेल्वे जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

भारतीय रेल्वेशी निगडित अशा अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्हाला अभिमान वाटेल. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की, भारतीय रेल्वे केवळ प्रवासी आणि मालगाड्याच चालवत नाही तर जगातील सर्वात मोठे चालते-फिरते हॉस्पिटल देखील चालवते.

या वर्षी मुंबईतून सुरुवात झाली

भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पेशल ट्रेनचे (Worlds First Hospital Train), नाव 'लाइफलाइन एक्सप्रेस' असे आहे. रेल्वेने जुलै 1991 मध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही ट्रेन सुरु केली.

सुरुवातीला या ट्रेनचे नाव 'जीवन रेखा एक्स्प्रेस' होते, जी नंतर लाइफलाइन एक्सप्रेस झाली. ही ट्रेन देशातील दूरवरच्या भागात जिथे मोठे हॉस्पिटल नाही किंवा डॉक्टर-आरोग्य सुविधांचा अभाव आहे, अशा ठिकाणी लोकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.

सर्व रुग्णालय सुविधा ट्रेनमध्ये मिळतात

दुसरीकडे, या ट्रेनमध्ये (Worlds First Hospital Train) सर्व सुविधा आहेत, ज्या सामान्य हॉस्पिटलमध्ये असायला हव्यात. या संपूर्ण ट्रेनची रचना फिरत्या रुग्णालयाप्रमाणे (Hospital) करण्यात आली आहे. यात ऑपरेशन थिएटर, तपासणीसाठी आधुनिक मशीन, रुग्णांसाठी बेड आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर-पॅरा मेडिकल स्टाफ आहे.

ट्रेनच्या प्रत्येक डब्यात मेडिकल वॉर्ड, पॉवर जनरेटर, ऑक्सिजन आणि वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या आहेत. यासोबतच, या मेडिकल ट्रेनमध्ये पॅन्ट्री कारची सुविधाही जोडण्यात आली आहे.

आतापर्यंत 12 लाख लोकांवर उपचार करण्यात आले आहेत

भारतीय रेल्वेच्या अहवालानुसार, या मार्गावरील हॉस्पिटल ट्रेनच्या (Worlds First Hospital Train) मदतीने आतापर्यंत सुमारे 12 लाख लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. ही जगातील पहिली आणि एकमेव अशी हॉस्पिटल ट्रेन आहे, जी देशातील दुर्गम भागात जाऊन गरजू रुग्णांवर मोफत उपचार करते. सध्या ही ट्रेन आसाममधील बदरपूर स्टेशनवर उभी असून तिथल्या लोकांवर उपचार करत आहे.

देशाचा प्रत्येक भाग व्यापते

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या ट्रेनमध्ये (Worlds First Hospital Train) 2 आधुनिक ऑपरेशन थिएटर, 5 ऑपरेटिंग टेबल आहेत. ट्रेनचा प्रत्येक डबा वातानुकूलित आहे. नसबंदी कार्यक्रमाला चालना देण्यासाठी ट्रेनमध्ये एक विशेष कोच देखील आहे, जिथे शस्त्रक्रियेनंतर पुरुष आणि महिलांना प्रवेश दिला जातो. गेल्या 32 वर्षांपासून धावणारी ही ट्रेन देशाचा प्रत्येक भाग व्यापते आणि नियमितपणे मागासलेल्या भागात जाते.

रुग्णाच्या काळजीपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत

या ट्रेनमध्ये (Worlds First Hospital Train) एकूण 7 डबे आहेत. तिच्या वेळापत्रकानुसार ही ट्रेन वेगवेगळ्या राज्यात जाते आणि तिथल्या स्थानकांवर थांबते. त्यानंतर तिथले लोक उपचारासाठी येतात. भारतीय रेल्वे इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने ही ट्रेन चालवते. या ट्रेनमध्ये नियमित तपासणी व्यतिरिक्त गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि इतर उपचार केले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Monsoon 2024: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

SCROLL FOR NEXT