Indian Railways Updates: जून महिन्यात वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेने ट्वीट करत दिली मोठी अपडेट!

Indian Railways: वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना रेल्वेकडून एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
Vaishno Devi
Vaishno Devi Dainik Gomatak

Indian Railways Updates: वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना रेल्वेकडून एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे.

आता वैष्णोदेवी आणि हरिद्वारला जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून एक विशेष ट्रेन चालवली जात आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मोफत मिळणार आहेत.

यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही. धार्मिक यात्रेला जाणाऱ्यांसाठी रेल्वे वेळोवेळी विशेष पॅकेज आणते. आता IRCTC ने प्रवाशांसाठी अशी सुविधा आणली आहे, ज्यानंतर तुम्ही वैष्णोदेवी आणि हरिद्वारलाही आरामात जाऊ शकाल.

IRCTC ने ट्विट केले आहे

IRCTC ने ट्विट केले की, 'वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी रेल्वे एक विशेष ट्रेन चालवत आहे. वैष्णोदेवी हरिद्वार भारत गौरव स्पेशल ट्रेनने तुमचा प्रवास आणखी सोपा होईल. याविषयी अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत लिंक http://tinyurl.com/EZBG06 ला भेट देऊ शकता.'

Vaishno Devi
Indian Railways: रेल्वे देतेय दरमहा 80,000 रुपये कमावण्याची संधी, जाणून घ्या काय आहे सरकारची योजना?

हा प्रवास 7 दिवसांचा असेल

हा प्रवास 7 रात्री 8 दिवसांचा असेल असे रेल्वेने सांगितले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही 25 जून 2023 ते 2 जुलै 2023 पर्यंत प्रवास करु शकता. ही ट्रेन कोलकाता (Kolkata) ते वैष्णोदेवीपर्यंत धावेल आणि नंतर हरिद्वारमार्गे कोलकाता परतेल.

भाडे किती असेल?

दरम्यान, पॅकेजबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये इकॉनॉमी क्लासचे प्रति व्यक्ती भाडे 13,680 रुपये आहे. याशिवाय, स्टँडर्ड क्लासचे भाडे 21,890 रुपये प्रति व्यक्ती आणि कम्फर्ट क्लासचे भाडे 23,990 रुपये प्रति व्यक्ती आहे.

Vaishno Devi
Indian Railways: राजधानी-शताब्दीने प्रवास करणाऱ्यांचे बल्ले-बल्ले, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले...

कोणत्या सुविधा उपलब्ध असतील?

इकॉनॉमी क्लासमध्ये तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना स्लीपरमध्ये प्रवास करावा लागेल. याशिवाय, नॉन-एसी रुममध्ये राहण्यासाठी उपलब्ध असतील. त्याचवेळी, मल्टी-शेअरिंगची सुविधा उपलब्ध असेल. त्याचबरोबर स्टँडर्ड आणि कम्फर्ट क्लासच्या प्रवाशांना थर्ड एसीमध्ये प्रवास करावा लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com