Tirupati, IRCTC tourism packages, Tirupati Balaji darshan packages Dainik Gomantak
अर्थविश्व

Summer Tour: तिरुपती-तिरुअनंतपुरमसाठी IRCTC चे खास टूर पॅकेज

रेल्वेच्या या विशेष पॅकेजमध्ये तुम्हाला दक्षिण भारतातील तिरुअनंतपुरम, तिरुपती इत्यादी प्रमुख मंदिरांना भेट देण्याची संधी मिळेल.

दैनिक गोमन्तक

जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुटीत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी येत आहे. वास्तविक, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) एक अतिशय आलिशान आणि परवडणारे टूर पॅकेज ऑफर करत आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही उन्हाळ्याच्या सुटीत दक्षिण भारतातील तिरुअनंतपुरम, तिरुपती इत्यादी प्रमुख मंदिरांना भेट देवू शकता. (IRCTC tourism packages)

या पॅकेजमध्ये तुम्ही दक्षिण भारतातील तिरुवनंतपुरम, तिरुपती, रामेश्वरम इत्यादी प्रमुख मंदिरांना भेट देवू शकता. या उन्हाळ्याच्या (Summer) सुट्टीत तुम्हीही दक्षिण भारताला भेट देण्याचा विचार करत असाल तर जाणून घेऊया या पॅकेजच्या खास गोष्टी कोणत्या आहेत. पुढील ठिकाणांना देता येणार भेट.

* तिरुपती - श्री पद्मावती मंदिर, कपिलेश्वर स्वामी मंदिर, श्री कालहस्ती मंदिर, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, इस्कॉन मंदिर.

* रामेश्वरम-रामनाथ स्वामी मंदिर

* मदुराई-मीनाक्षी मंदिर

* तिरुवनंतपुरम-पद्मनाभम मंदिर

* या पॅकेजचे खास गोष्टी कोणत्या

* हे टूर पॅकेज 10 रात्री 11 दिवसांचे आहे.

* तुम्ही दक्षिण भारतातील प्रमुख धार्मिक शहरांना भेट देऊ शकता.

* गोरखपूर, वाराणसी, प्रयागराज संगम, लखनौ, कानपूर, वीरांगना लक्ष्मीबाई स्टेशन येथून बोर्डिंग/डिबोर्डिंग करता येते.

* या टूर पॅकेजमध्ये तुम्ही स्पेशल टूर पॅकेज ट्रेनने प्रवास करू शकता.

* तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळते

* हे पॅकेज 28 एप्रिल ते 8 मे पर्यंत चालणार आहे.

* या पॅकेजमध्ये तिरुपती, रामेश्वरम, मदुराई आणि तिरुवनंतपुरम इत्यादी ठिकाणांचा समावेश आहे.

* स्लीपर क्लाससाठी 20,440 रुपये आणि 3 एसी क्लाससाठी प्रति व्यक्ती 28,750 रुपये भरावे लागतील.

* या संपूर्ण प्रवासात तुम्हाला ठिकठिकाणी राहण्यासाठी धर्मशाळेची सुविधा मिळेल.

* बुकिंग कसे करावे
या पॅकेजची बूकिंग सुरू झाली आहे. तुम्हाला जर अधिक हवी असेल किंवा बूकिंग करायची असेल तर https://www.irctctourism.com/pacakage_description packageCode=NZSD02 वर क्लिक करून मिळवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Fishing: जप्त केलेल्या गोव्याच्या त्या 2 ट्रॉलर्सचा ताबा महाराष्ट्राकडेच! 'एलईडी मासेमारी' खपवून घेणार नाही, मंत्री नितेश राणेंची कडक भूमिका

Man Falls in Well: कारापूर वाठारांत बांयत पडील्ल्या तरणाट्याक वाचोवपाक उजो पालोवपी दळाक येस

Crime News: आईसोबत प्रियकराला बघितलं, त्याची सटकली, दोघांचीही गळा दाबून केली हत्या; मृतदेह पिकअपमधून नेले पोलिस ठाण्यात

Delhi Police Arrest 3 Terrorists: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई, 'ISI'शी संबंधित 3 दहशतवाद्यांना अटक

Shivaji Maharaj Goa History: शिवरायांची स्वारी ठरली, पोर्तुगीज सैन्य पळून गेले; महाराज सैन्यासह डिचोली येथे मुक्कामाला गेले..

SCROLL FOR NEXT