PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

Diwali Gift For Indian Railways Employees: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी फेस्टिव्ह बोनस जाहीर केला.

Manish Jadhav

Diwali Gift For Indian Railways Employees: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी फेस्टिव्ह बोनस जाहीर केला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णयाला मंजुरी देण्यात आली. देशातील सर्व नॉन-गॅझेटेड रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस दिला जाणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराएवढा बोनस मिळणार आहे.

दरम्यान, या बोनससाठी 7 हजार रुपयांच्या किमान पगाराची मर्यादा ठरवली. या हिशोबाने कर्मचाऱ्यांना 17,951 रुपयांचा बोनस मिळतो. ही किमान पगाराची मर्यादा 2024-15 पासून बदललेली नाही. त्यामुळे मागील 11 वर्षांपासून बोनसच्या रकमेत कोणतीही वाढ झालेली नाही.

दुसरीकडे मात्र, रेल्वे युनियन्स आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली. किमान पगाराची मर्यादा वाढवून ती 18 हजार ते 28 हजार रुपयांपर्यंत करण्याची मागणी करण्यात आली. जर ही मर्यादा वाढवली, तर कर्मचाऱ्यांचा बोनस 46 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

कोल इंडिया आणि सेल (SAIL) सारख्या इतर सरकारी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा बोनस मागील काही वर्षांत 2 ते 3 पटीने वाढला आहे. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांचा बोनस स्थिर राहिल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळावा, अशी मागणी युनियन्सकडून सातत्याने केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

SCROLL FOR NEXT