Indian economy now stable GST compensation to states on time: Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

अर्थव्यवस्था तेजीत, राज्यांना GSTचा परतावा ही आता वेळेत: अर्थमंत्री

दैनिक गोमन्तक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman ) यांनी गुरुवारी सांगितले की भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) आता तेजीत येताना दिसत आहे .कारण देशातील साऱ्याच उद्योजकांनी त्यात हातभार लावला आहे. आणि याचाच फायदा देशाला होताना दिसत आहे. आणि त्याचमुळे अर्थ मंत्रालयाला (Finance Ministry) खात्री आहे की या वर्षी सर्व राज्यांना जीएसटीचा (GST) परतावा वेळेवर मिळेल अशी घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. आणि याचमुळे राज्यांना आता सर्व विकासात्मक कामे करण्यासाठी हातात पैसे असतील. (Indian economy now stable GST compensation to states on time: Nirmala Sitharaman)

सीआयआयच्या वार्षिक सभेला संबोधित करताना सीतारामन यांनी कोविड -19 महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत देश आव्हानांना सामोरे जात असताना देखील उद्योग क्षेत्र सकारात्मक राहले त्यामुळे त्यांनी उद्योगाचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या लाटेचा परिणाम ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला .

अर्थमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे की कोविड -19 साथीच्या प्रभावापासून देशाच्या आर्थिक पुनर्प्राप्तीमध्ये सरकार सक्रिय सहभागी असून कोविड -19 च्या उद्रेकादरम्यान सुद्धा अर्थव्यवस्था जवळपास 9 टक्क्यापर्यंत वाढली आहे. कारण सरकारने त्याही काळात आवश्यक अशा सर्व व्यपाराला परवानगी दिली आहे.

सीतारामन यांनी सांगितले की एफडीआय भारतात येत आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत थेट परकीय गुंतवणूक 37% वाढली आहे. जुलै 2021 पर्यंत देशातील परकीय साठा 620 अब्ज डॉलर्सवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे .आणि आता अर्थव्यवस्था आणखीन वेगाने सुधरेल अशेच संकेत मिळत आहेत.

तसेच प्रत्यक्ष कर आकारणीतही भरभराट होत असून निर्गुंतवणूक आणि खाजगीकरणाची आमची वचनबद्धता कायम आहेच असे स्पष्टीकरणही निर्मला सीतारामन यांनी दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

6.80 लाखांचे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी छत्तीसगडच्या महिलेला अटक, म्हापशात भेसळयुक्त 200 KG बडीशेप जप्त; गोव्यातील ठळक बातम्या

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT