IAF Recruitment 2023:  Dainik Gomantak
अर्थविश्व

IAF Recruitment 2023: भारतीय हवाई दलात भरती सुरू, 'या' दिवशी सुरू अर्ज

भारतीय हवाई दलाने अग्निवीरवायू भर्ती सुरू केली असून अर्ज कधी करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

भारतीय हवाई दलात भर्ती व्हायचे असेल तर ही उत्तम संधी आहे. भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायु भरती 2024 साठी अधिसूचना जारी केली आहे. हे पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जावे लागेल. ही भर्ती प्रक्रियेत केवळ अविवाहित स्त्री-पुरुष अर्ज करू शकतात.

  • या दिवसापासून अर्ज सुरू

भारतीय वायु सेना अग्निवीरवायु भर्ती 2024 साठी 27 जुलैपासून अर्ज सुरू होणार आहे. या दिवशी सकाळी 10 वाजता रजिस्ट्रेशन लिंक सुरू होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारिख ही 17 ऑगस्ट 2023 आहे.

  • पात्रता कोणती

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असावा

बारावीत एकूण किमान 50 टक्के आणि इंग्रजी विषयात किमान 50 टक्के गुण असावेत.

इतर पात्रता तुम्ही अधिकृत वेबसाइटवरून तपासू शकता.

  • किती फी भरावी लागेल

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल. हे पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे करता येते. निवड परीक्षेच्या अनेक टप्प्यांनंतर केली जाईल. प्रथम फेज एक ऑनलाइन परीक्षा, त्यानंतर दुसरा टप्पा ऑनलाइन परीक्षा त्यानंतर शारीरिक फिटनेस चाचणी, अनुकूलता चाचणी (1 आणि 2) आणि वैद्यकीय परीक्षा होईल. सिलेक्ट होण्यासाठी सर्व परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT