Instagram चे Threads लॅपटॉपमध्येही येईल वापरता, अशी करा सेटिंग

तुम्ही लॅपटॉपमध्ये मेटा थ्रेड्स अॅप देखील चालवू शकता.यासाठी काय करावे लागेल जाणून घेऊया.
Threads App
Threads AppDainik Gomantak
Published on
Updated on

Threads: इस्टाग्रामचे थ्रेड्स अॅपने अवघ्या 5 दिवसांत 100 दशलक्ष युजरबेस गाठून जगभरात एक नवा विक्रम निर्माण केला आहे. त्याचे युजर्स सातत्याने वाढत आहेत. Meta ने 100 हून अधिक देशांमध्ये Android आणि iOS साठी थ्रेड्स अॅप जारी केले आहे.

सध्या त्याची वेब वर्जन नाही. म्हणजेच, आपण ते लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर चालवू शकत नाही. पण आज आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या विंडोज लॅपटॉपवर Threads App सहज वापरू शकता.

WindowsCentral च्या अहवालानुसार, लॅपटॉपमध्ये Threads वापरण्यासाठी तुम्हाला थ्रेड्सची APK फाइल डाउनलोड करावी लागेल आणि मायक्रोसॉफ्ट स्टोअरमधून WSATools अॅप डाउनलोड करावे लागेल. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पुढिल स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

पहिले Android अॅपसाठी विंडो सब-सिस्टम ओपन करावे

साइडबारद्वारे एडवांस सेटिंग्जमध्ये प्रवेश करा

येथे डेवलपर्स मोडमध्ये जा आणि ते ऑन करा

आता WSA टूल्स ऍप्लिकेशन उघडा आणि सर्व सूचनांचे अनुसरण करा

आता थ्रेड्स अॅप शोधा आणि ते इनस्टॉल करा

एकदा इन्स्टॉल केल्यावर तुम्ही लॅपटॉपमध्ये थ्रेड्स सहज वापरू शकता

लक्षात ठेवा, थ्रेड्सवर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला Instagram ID आवश्यक असेल.

Threads App
Is Tea Good For Children?: लहान मुलांसाठी चहा वाईट का आहे? वाचा यामागे काय कारण...
  • मस्क आणि मार्क यांच्यातील वाद

Threads अॅप लाँच झाल्यानंतर एलॉन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्यातील शब्दयुद्ध अधिक तीव्र झाले आहे. नुकतेच, मस्कने एक ट्विट केले होते ज्यात त्यांनी मेटाचे सीईओ Cuck ला कमकुवत असे म्हटले होते. एकीकडे, जिथे थ्रेड्सचा युजरबेस सतत वाढत आहे, दुसरीकडे, ट्विटरची रँकिंग सतत कमी होत आहे.

2022 च्या अखेरीस ट्विटरवर 259 दशलक्ष युजर्स होते. तर, थ्रेड्सने अवघ्या 5 दिवसांत 100 दशलक्ष युजरबेस ओलांडला आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना खात्री आहे की लवकरच हे अॅप 1 अब्ज युजरबेस पार करेल आणि लोकप्रिय अॅप्समध्ये त्याचा समावेश होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com