Indian Economy Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Economy: गूड न्यूज! जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; 30 महिन्यांतच केली कमाल

India World’s Fourth Largest Economy: भारताने आर्थिक पातळीवर पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. आता असा अंदाज लावला जात आहे की, पुढील 30 ते 36 महिन्यांत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

Manish Jadhav

भारताने आर्थिक पातळीवर पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. आता असा अंदाज लावला जात आहे की, पुढील 30 ते 36 महिन्यांत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. सध्याच्या अनिश्चिततेचा विचार करता आयएमएफपासून ते जागतिक बँकेपर्यंत, सर्वजण भारताचा विकासदर 6 टक्क्यांपेक्षा जास्त असेल असे गृहीत धरत आहेत. जे जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान आहे. म्हणूनच येत्या 30 ते 36 महिन्यांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. चला तर मग नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी याबद्दल काय म्हटले ते देखील जाणून घेऊया...

जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले की, भारत जपानला (Japan) मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या 10व्या बैठकीनंतर सुब्रमण्यम म्हणाले की, एकूणच जागतिक आणि आर्थिक वातावरण भारतासाठी अनुकूल आहे. आज आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. आज 4,000 अब्ज डॉलर्सची भारतीय अर्थव्यवस्था आहे.

तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा

ते पुढे म्हणाले की, फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे भारतापेक्षा पुढे आहेत. जर आपण आपल्या योजना आणि विचारांवर ठाम राहिलो तर अडीच ते तीन वर्षांत म्हणजेच 30 ते 36 महिन्यांत आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. याचा अर्थ असा की, 2027-2028 मध्ये भारत (India) जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असेल किंवा होईल. भारताची अर्थव्यवस्था तेव्हा 5 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त होईल.

ट्रम्पच्या विधानावर त्यांनी काय म्हटले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपलबाबत अलिकडेच केलेल्या वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुब्रह्मण्यम म्हणाले की, टॅरिफ दर काय असतील हे अनिश्चित आहे. पण ज्या पद्धतीने परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे आपण उत्पादनासाठी स्वस्त ठिकाण बनू. ट्रम्प म्हणाले होते की, त्यांना आशा आहे की अमेरिकेत विकले जाणारे अ‍ॅपल आयफोन भारतात किंवा इतर कुठेही नाही तर अमेरिकेतच तयार केले जातील. मालमत्तेच्या मुद्रीकरणाचा दुसरा टप्पा तयार केला जात आहे आणि ऑगस्टमध्ये त्याची घोषणा केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT