China President Xi Jinping Dainik Gomantak
अर्थविश्व

China Economy: चीनला मोठा झटका! जीडीपी वाढीचा रेट मंदावला, फिच रेटिंग एजन्सीचा दावा

China Economy: चीनच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. चीनला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे.

Manish Jadhav

China Economy: चीनच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. चीनला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. यावेळी, फिच रेटिंग एजन्सीने 2023 च्या आर्थिक वर्षातील जीडीपी वाढीच्या अंदाजाने चीनला धक्का दिला आहे.

फिचने चीनचा जीडीपी अंदाज कमी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याआधी चीनचा जीडीपी अंदाज 5.6 टक्के होता पण फिचने तो 80 बीपीएसने कमी केला आहे. चालू आर्थिक वर्षात चीनची अर्थव्यवस्था 4.8 टक्के वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

तथापि, या वेळी चीनसाठी एक दिलासादायक बातमी देखील होती की, एजन्सीने चीनचे दीर्घकालीन लॉन्ग टर्म फॉरेन करन्सी इश्यूर डिफॉल्ट रेटिंग्स A+ वर कायम ठेवले आहे.

फिचचे रेटिंग जारी केल्यानंतर, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी शी जिनपिंग सरकारवर (Government) दबाव वाढत आहे.

चीनचा जीडीपी घसरण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला

फिच व्यतिरिक्त, पाश्चात्य देशांच्या चार मोठ्या बँका - UBS, स्टँडर्ड चार्टर्ड, बँक ऑफ अमेरिका आणि जेपी मॉर्गन यांनी देखील चीनच्या जीडीपी वाढीशी संबंधित अंदाजात कपात केली आहे.

या बँकांचा अंदाज आहे की, चीनचा जीडीपी 5.2 ते 5.7 टक्क्यांच्या दरम्यान असेल, तर याआधी या बँकांनी चीनचा (China) जीडीपी वाढ 5.7 ते 6.3 टक्क्यांच्या दरम्यान असण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

चीनसमोर संकटांचा डोंगर

दुसरीकडे, जूनमध्ये, S&P ग्लोबलने देखील चीनच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 2023 मध्ये चीनची जीडीपी वाढ 5.2 टक्क्यांच्या जवळ असू शकते. गोल्डमन सॅक्स आणि इतर मोठ्या गुंतवणूक बँकांनीही चीनचे रेटिंग कमी केले आहे.

चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र, अलीकडच्या काही महिन्यांत चीनच्या अर्थव्यवस्थेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चीनचे रिअल इस्टेट मार्केट गंभीर संकटात आहे.

औद्योगिक उत्पादन आणि किरकोळ विक्री वाढ अंदाजापेक्षा कमी आहे. त्याचवेळी, चीनमध्ये बेरोजगारी 20.8 टक्क्यांवर पोहोचली आहे.

त्यानंतर आता फिचच्या मते, चीनचा जीडीपी वाढ यंदा 4.4 टक्के ते 6.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, चीन सरकारने 5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारताचा विकास दर वेगाने वाढत आहे

तसेच, एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेने 7.8 टक्के वाढ नोंदवली आहे. जगातील कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत हा सर्वात वेगवान विकास दर आहे.

भारताच्या आर्थिक तज्ञांनी पहिल्या तिमाहीत 7.7 टक्के जीडीपी वाढीचा अंदाज वर्तवला होता. भारताच्या जीडीपीने सर्व तज्ञ आणि रेटिंग एजन्सींच्या अंदाजांना मागे टाकत उत्कृष्ट वाढ नोंदवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

Rohit-Virat Comeback: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी पुन्हा मैदानात उतरणार रोहित-विराट; ऑस्ट्रेलियात रंगणार रणसंग्राम

Goa Assembly Live: म्हादई अहवालाविषयी जलस्रोत खात्याने एनआयओला विचारणा केली आहे काय?

CM Pramod Sawant: 'आमच्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री...', राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री सावंतांचं वक्तव्य

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT