भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत (Strong foundation of Indian economy) झाला आहे. असे स्पष्टीकरण मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम (Krishnamurthy Subramanian) यांनी दिले आहे. Dainik Gomantak
अर्थविश्व

भारत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी सज्ज

जर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने या वर्षाच्या अखेरीस 120 अब्ज डॉलरची एक महिन्यासाठी शिथिलता करण्यास सुरुवात केली, तर भारतला (India) आर्थिक संकटाच्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहावे लागेल.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: भारताची आर्थिक गणिते (Economic calculations of India) 2008-09 च्या जागतिक आर्थिक संकटानंतर बिघडली होती. कोविड-19 (Covid-19) च्या उद्रेकानंतर मागणी आणि पुरवठा या दोन्ही गोष्टींचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे कोणतेही आर्थिक संकट झेलायला (To face financial crisis) भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy) भक्कमपणे उभी आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत (Strong foundation of Indian economy) झाला आहे. असे स्पष्टीकरण मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम (Krishnamurthy Subramanian) यांनी दिले आहे.

भारतातील अनेक कंपन्यांनी अलिकडच्या वर्षात उत्पादन जास्त करून, खर्च कमी केले आहेत. यामुळे त्यांचा नफा वाढल्याने, ते पुन्हा मोठी गुंतवणूक करू शकतात. गेल्या दीड वर्षात भारतात केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणा लक्षात घेता, मला भारताच्या या दशकात आर्थिक उलढलीच्या उच्च वाढीची अपेक्षा आहे, असे सांगण्यात मला संकोच वाटत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. जर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने या वर्षाच्या अखेरीस 120 अब्ज डॉलरची एक महिन्यासाठी शिथिलता करण्यास सुरुवात केली, तर भारतला आर्थिक संकटाच्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहावे लागेल, असे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी एका मुलाखतीत सांगितले.

येत्या काही महिन्यांत महागाई 6 टक्क्यांच्या खाली येण्याची शक्यता असून, चालू खात्यातील तूटीला (सीएडी) लगाम घालण्यास आणि वित्तीय तूट वाढण्यास (आर्थिक वर्ष 22 मधील जीडीपीच्या 6.8% च्या अंदाजपत्रक पातळीपासून) प्रतिबंध करण्यास मदत करेल असे मत सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले. तसेच सरकारची सलग दुसऱ्या वर्षासाठी बाजारातील कर्ज घेण्याची योजना सुरळीत राहील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जुलैमध्ये जीएसटीची वाढ 1.16 लाख कोटी रुपयांपर्यंत गेल्यानंतर जूनमध्ये 92,849 कोटी रुपयांवर घसरली, अशी माहिती समोर येत आहे.

FY22 मध्ये ग्लोबल बॉण्ड इंडेक्सवर सरकारी सिक्युरिटीजच्या काही वर्गाची यादी करण्याच्या प्रस्तावाबद्दल विचारले असता सुब्रमण्यम म्हणाले, या योजना अजून चालू आहेत. महसूल विभाग या आघाडीवर दोन मुद्द्यांवर काम करत आहे. तसेच लसीकरण मोहिमेने आणखी प्रगती केल्याने, एकूण सेवा क्षेत्र अधिक गती निर्माण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT