Money Dainik Gomantak
अर्थविश्व

भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ !

भारताने (India) यामध्ये मोठी झेप घेत अमेरिका आणि चीननंतर 145 अब्जाधीशांसह तिसरे स्थान पटकावले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतात श्रीमंतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. याच पाश्वभूमीवर एका अहवालानुसार, 2021 मध्ये देशात अल्ट्रा एचएनआय ($ 30 million or more than Rs. 226 crore) असणाऱ्यांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे जागतिक स्तरावर अब्जाधीशांच्या संख्येत भारताने (India) इतर देशांना मागे टाकले आहे. (India Has Jumped To Third Place With 145 Billionaires After The US And China)

अमेरिका-चीननंतर भारत

मालमत्ता सल्लागार फर्म नाइट फ्रँकच्या मते, 2021 मध्ये जागतिक स्तरावर अब्जाधीशांच्या लोकसंख्येमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालात दिलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास 748 अब्जाधीशांसह अमेरिका (America) पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 554 अब्जाधीशांसह चीनचा (China) क्रमांक लागतो. त्याच वेळी, भारताने यामध्ये मोठी झेप घेत अमेरिका आणि चीननंतर 145 अब्जाधीशांसह तिसरे स्थान पटकावले आहे.

तसेच जागतिक वाढ

वेल्थ रिपोर्ट 2022 नुसार, जागतिक स्तरावर अल्ट्राएचएनआयची संख्या 2021 मध्ये 9.3 टक्क्यांनी वाढून 6,10,569 झाली. जी मागील वर्षी याच कालावधीत 5,58,828 होती. नाइट फ्रँकच्या मते, भारतात अब्जाधीशांची संख्या सातत्याने वाढत आहे. अहवालानुसार, भारतात त्यांची संख्या 2021 मध्ये 13,637 पर्यंत वाढली, जी मागील वर्षी 2020 मध्ये 12,287 होती.

बंगलोरमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती

अहवालानुसार, जर श्रीमंतांच्या बाबतीत प्रमुख भारतीय शहरांबद्दल बोलायचे झाल्यास बंगळुरु या क्रमवारीत अव्वल आहे. 226 कोटींहून अधिक संपत्ती असलेल्या शहरांमध्ये सर्वाधिक 17.1 टक्‍क्‍यांसह बेंगळुरु, 12.4 टक्‍क्‍यांसह दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आणि 9 टक्‍क्‍यांसह मुंबई आहे. नाइट फ्रँकने 2026 पर्यंत अशा श्रीमंत व्यक्तींची संख्या 39 टक्क्यांनी वाढून 19,006 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 2016 मध्ये त्यांची संख्या 7,401 होती.

श्रीमंतांच्या संपत्तीत तेजी येईल

शिवाय, नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणाले, भारतातील UHNWI च्या वाढीमध्ये इक्विटी मार्केट आणि डिजिटायझेशनला प्रोत्साहन हे महत्त्वाचे घटक आहेत. अहवालानुसार, भारतातील सुमारे 69 टक्के अतिश्रीमंतांच्या संपत्तीत यावर्षी 10 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT