..तर 15 वर्षांनंतर 20 लाख रुपये मिळतील, कसे ते जाणून घ्या

अशा प्रकारे लाखो रुपयांचा निधी उभारला जाणार
finance saving
finance savingDainik Gomantak
Published on
Updated on

दररोज थोडी बचत करून ती योग्य ठिकाणी गुंतवावी. जर तुम्ही दररोज फक्त 100 रुपये इतकी छोटी रक्कम जमा केली तर तुम्ही 20 लाख रुपयांचा निधी जमा करू शकता. म्युच्युअल फंड यात अधिक चांगल्या प्रकारे मदत करत आहे.

अशा प्रकारे लाखो रुपयांचा निधी उभारला जाणार

आजकाल रोजगाराच्या संधी मर्यादित झाल्या आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अशा वातावरणात तुम्ही दिवसाला 100 रुपयेही वाचवले तर ते महिन्याला 3,000 रुपये होतील. तुम्ही हे रु. 3,000 दरमहा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये ठेवू शकता म्हणजेच एका चांगल्या म्युच्युअल फंड योजनेच्या SIP मध्ये. तुम्हाला ही गुंतवणूक 15 वर्षे सतत करावी लागेल. सध्या बाजारात असे अनेक म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी गेल्या 15 वर्षांत वार्षिक 15 टक्के परतावा दिला आहे. जर तुम्हाला असाच परतावा मिळत राहिला तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे 20 लाख रुपये जमा होतील.

finance saving
413 कर्मचार्‍यांसाठी 10 बसेस उत्तर प्रदेशला रवाना

अशा प्रकारे तुमची रक्कम वाढेल

जर तुम्ही म्युच्युअल फंड (Mutual Fund) योजनेत दरमहा 3,000 रुपये गुंतवले आणि ही गुंतवणूक 15 वर्षे चालू राहिली तर तुमचे ध्येय साध्य होऊ शकते. 15 वर्षांनंतर तुमची एकूण गुंतवणूक 5.40 लाख रुपये होईल. जर तुमच्या फंडची कामगिरी चांगली असेल, तर 15 वर्षांनंतर तुमच्या एसआयपीची रक्कम 20 लाख रुपये होईल. म्हणजे 14.60 लाख रुपयांचा परतावा मिळेल.

एसआयपी गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग

कोणत्याही सामान्य गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एसआयपी. अशा प्रकारे गुंतवणूक केल्यास चांगली सरासरी मिळते, ज्यामुळे तोट्याचा धोका कमी होतो. असे झाल्यास चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यताही वाढते. पूर्वनियोजित पद्धतीने गुंतवणूक करा.

finance saving
रिकाम्या पोटी या 2 गोष्टी खा, प्रोटीनसह शरीरातील ही कमतरता होईल दूर

अनेक फंड परफॉर्मन्स देत आहेत

म्युच्युअल फंडाच्या परताव्याबद्दल बोलायचे झाल्यास, काही चांगल्या योजनांनी 15 वर्षांत 15 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. यामध्ये अनेक फंडांची नावे येतात. परंतु, आम्ही गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेला लक्षात घेऊन कोणत्याही फंडचे नाव देत नाही. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की गुंतवणुकीत तुमची संपूर्ण रक्कम कोणत्याही एका फंडात टाकू नये. तुम्ही दरमहा रु. 3,000 गुंतवत असाल, ते तीन भागांत विभागून तीन वेगवेगळ्या फंडांमध्ये टाका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com