World Bank
World Bank Dainik Gomantak
अर्थविश्व

World Bank: भारताच्या आरोग्य क्षेत्राला मिळणार चालना, 1.75 अब्ज कर्ज मंजूर

दैनिक गोमन्तक

World Bank: जागतिक बँकेने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि खाजगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी US $ 1.75 अब्ज (About Rs 13,834.54 crore) कर्ज मंजूर केले आहे. या कर्जापैकी एक अब्ज डॉलर्स आरोग्य क्षेत्रासाठी दिले जातील, तर उर्वरित $750 दशलक्ष अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जातील. हे क्रेडिट डेव्हलपमेंट पॉलिसी कर्ज (CDPL) स्वरुपात असेल. (India Gets 1.75 Billion Dollar Loan From World Bank For Health Sector)

आरोग्य सेवा क्षेत्राला चालना मिळेल

जागतिक बँकेच्या (World Bank) कार्यकारी संचालक मंडळाने भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी $500 दशलक्ष डॉलर्सची दोन पूरक कर्जे मंजूर केली आहेत.

PM-ABHIM ला पाठिंबा देईल

जागतिक बँकेने पुढे सांगितले की, 'एक अब्ज डॉलर्सच्या या संयुक्त वित्तपुरवठाद्वारे, जागतिक बँक भारताच्या पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाला (PM-ABHIM) मदत करेल.' ही योजना ऑक्टोबर 2021 मध्ये सुरु झाली.

निधी कुठे वापरणार?

ही रक्कम देशभरातील सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी वापरली जाईल. एजन्सीने सांगितले की, 'एका कर्जाखाली आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), केरळ, मेघालय, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या सात राज्यांना प्राधान्य दिले जाईल.'

कर्ज धोरण मंजूर

जागतिक बँकेच्या मंडळाने पायाभूत सुविधा, छोटे व्यवसाय आणि खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी विकास धोरण कर्ज मंजूर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT