Indian Economy  Dainik Gomantak
अर्थविश्व

UK ला मागे टाकत India बनली जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

एक दशकापूर्वी भारत अकराव्या स्थानावर तर, ब्रिटन पाचव्या स्थानी होता

गोमन्तक डिजिटल टीम

ब्रिटनला (United Kingdom) मागे टाकत भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जीडीपीनुसार (IMF GDP) अमेरिकन डॉलवरती हे मूल्यांकन आधारित आहे. यावर्षी भारतीय अर्थव्यवस्था सात टक्क्यांहून अधिक वाढू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. एक दशकापूर्वी भारत या क्रमवारीत अकराव्या स्थानावर होता. तर, ब्रिटन पाचव्या स्थानी होता.

जागतिक नाणेनिधी संघटनेने यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आगेकूच करू शकते असा अंदाज वर्तविला होता. आकडेवारीच्या आधारावर सध्या ब्लूमबर्गने सुधारित अहवाल दिला आहे. त्यानुसार आता भारत जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था ठरली आहे. भारत आता अमेरिका (America), चीन (China), जपान (Japan) आणि जर्मनी (Germany) या देशांनंतर जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचीच्या अंदाजानुसार, आशियाई महासत्ता बनण्याच्या मार्गावर असलेल्या भारताने या वर्षी वार्षिक आधारावर डॉलरच्या बाबतीत ब्रिटनला मागे टाकलं आहे. दुसरीकडे ब्रिटनची अर्थव्यवस्था आणखी घसरू शकते, असं तज्ज्ञांचे मत आहे. दुसऱ्या तिमाहीत ब्रिटनचा जीडीपी केवळ एक टक्क्यांनी वाढला आणि चलनवाढीनंतर 0.1 टक्के कमी झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT