Post Office Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

Independence Day: पोस्टाची मोठी घोषणा, आता 25 रुपयांत मिळणार 'ही' गोष्ट!

India Post Office: भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि आता भारत आपला 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत आहे.

Manish Jadhav

India Post Office: भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि आता भारत आपला 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, हर घर तिरंगा मोहीम 2.0 चा भाग म्हणून देशभरातील पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाची विक्री केली जात आहे.

भारत सरकारने (Government) सर्व नागरिकांना घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. पोस्ट विभागानेही www.indiapost.gov.in या वेब पोर्टलद्वारे राष्ट्रध्वजाची ऑनलाइन विक्री जाहीर केली आहे.

हर घर तिरंगा

ऑल-इंडिया रेडिओ न्यूजच्या अधिकृत ट्विटनुसार, प्रत्येक घरात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी इंडिया पोस्ट ऑफिस आपल्या 1.60 लाख पोस्ट ऑफिसमधून (Post Office) राष्ट्रध्वज विकणार आहे. सरकार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा मोहीम राबवत आहे.

विभागाच्या ई-पोस्ट ऑफिस सुविधेद्वारेही नागरिक राष्ट्रध्वज खरेदी करु शकतात. हर घर तिरंगा मोहीम 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालवली जाईल.

इंडिया पोस्टद्वारे तिरंगा ऑनलाइन कसा खरेदी करायचा?

-पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर जा.

-'हर घर तिरंगा'च्या लिंकवर क्लिक करा.

- क्रेडेन्शियल्स वापरुन लॉग इन करा.

- 'उत्पादने' अंतर्गत 'राष्ट्रीय ध्वज' वर क्लिक करा आणि कार्टमध्ये जोडा.

- 'आता खरेदी करा' वर क्लिक करा; मोबाइल नंबर पुन्हा प्रविष्ट करा; आणि OTP सत्यापित करा.

-'पेमेंटसाठी पुढे जा' पर्यायावर क्लिक करा.

-इच्छित पेमेंट मोड वापरुन 25 रुपये भरा.

किंमत असेल

इंडिया पोस्ट ऑफिसमधून राष्ट्रध्वज ऑफलाइन देखील खरेदी करता येतो. यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खरेदी करु शकता.

तुम्ही राष्ट्रीय ध्वज जवळच्या पोस्ट ऑफिसमधून किंवा ऑनलाइन 25 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. PIB च्या 2 ऑगस्ट 2023 च्या प्रेस रिलीझनुसार, 'या मोहिमेत, पोस्ट विभाग गुणवत्तापूर्ण विक्री आणि वितरणासाठी एजन्सी आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: ‘देवाच्या पुनवे’ला उसळली गर्दी! देवी सातेरी, भगवतीचा उत्सव; आगरवाडा, पार्सेवासीय भक्तीत दंग

Goa Live News Updates: चलो बुलावा आया है! काँग्रेस हायकमांडकडून गोव्यातील नेत्यांना दिल्लीत येण्याचे आदेश

Purple Fest: पर्पल फेस्टसाठी गोवा सज्ज! 15 हजारांहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

SCROLL FOR NEXT