Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax Slab: इनकम टॅक्स लिमिट वाढणार, अडीच लाखांवरुन 3 लाखांपर्यंत...

Income Tax Slab: आयकर भरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्ही जर करदाते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Income Tax Slab: आयकर भरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्ही जर करदाते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अर्थसंकल्प मांडण्यास काही दिवस उरले आहेत. दरम्यान, बातम्या येत आहेत की, सरकार केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये करमुक्त मर्यादा वाढवू शकते.

सध्या 2.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे, मात्र ते 3 लाखांपर्यंत वाढवता येऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सामान्य जनता ते मध्यमवर्गाला मोठी भेट देऊ शकतात.

करमुक्त मर्यादा 3 लाख असू शकते

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी करदात्यांसाठी दिलासा देणाऱ्या घोषणा या बजेटमध्ये होऊ शकतात. परंतु सर्वात मोठा दिलासा म्हणजे, यावेळी सरकार (Government) करमुक्त मर्यादा वाढवू शकते. सरकार करमर्यादा 2.5 लाखांवरुन 3 लाखांपर्यंत वाढवू शकते, याचा अर्थ तुम्हाला पूर्वीपेक्षा कमी कर भरावा लागेल.

ही मर्यादा 9 वर्षांपूर्वी वाढवण्यात आली होती

या मर्यादेत शेवटची वाढ 2014 मध्ये झाली होती. त्यावेळी सरकारने ही मर्यादा दोन लाखांवरुन अडीच लाख रुपये केली होती. गेल्या 9 वर्षांपासून या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प (Budget) आहे, त्यामुळे यावेळी सरकार अनेक मोठ्या घोषणा करु शकते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 लाखांची मर्यादा आहे

आता तुम्हाला अडीच लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर कर भरावा लागणार नाही. या बजेटमध्ये सरकार तुमचा दिलासा आणखी 50,000 रुपयांनी वाढवू शकते. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलायचे झाल्यास, अशा लोकांसाठी ही मर्यादा 3 लाख रुपये आहे.

आता आयकर स्लॅब किती आहे?

>> अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न - करमुक्त

>> 2.5 ते 5 लाख वार्षिक उत्पन्न – 5% कर

>> 5 ते 10 लाख वार्षिक उत्पन्न – 20 टक्के कर

>> 10 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न - 30% कर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT