Income Tax Return Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax Return 2023-24: तुम्ही अजून ITR भरला नाही? 31 जुलैनंतर तारीख वाढवण्यासंबंधी आली नवीन मोठी अपडेट

Income Tax Return Filling Process: आर्थिक वर्ष 2022-23 (AY 2023-24) साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी सात दिवस शिल्लक आहेत.

Manish Jadhav

Income Tax Return Filling Process 2023-24: आर्थिक वर्ष 2022-23 (AY 2023-24) साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी सात दिवस शिल्लक आहेत. तुम्ही अजून रिटर्न भरले नसेल तर ते लवकर भरा.

दुसरीकडे, काही लोकांची अपेक्षा आहे की, आयटीआर फाईल करण्याची अंतिम तारीख वाढवली जाईल. अर्थ मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या अहवालाच्या आधारे, केंद्र सरकार 31 जुलै 2023 नंतर कोणतीही मुदतवाढ देण्यास तयार नाही.

कोणताही त्रास टाळण्यासाठी, आयकर विभाग करदात्यांना एसएमएस आणि ईमेलद्वारे त्यांचे वेळेत फाइलिंग पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे आठवण करुन देत आहे.

गतवर्षीपेक्षा अधिक भरणा होईल

दरम्यान, 31 जुलै ही तारीख जवळ आल्याने करदात्यांनी निर्धारित कालावधीत त्यांच्या कर दायित्वांची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे.

याआधी महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'आम्ही गेल्या वर्षीपेक्षा जास्त फाइलिंग होण्याची अपेक्षा करतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते अधिक राहण्याची अपेक्षा आहे.

जसजशी शेवटची तारीख जवळ येते तसतशी, करदात्यांना त्यांचे आर्थिक दस्तऐवज गोळा करण्यासाठी आणि सरकारने (Government) निश्चित केलेल्या देय तारखेचे पालन करण्यासाठी त्वरित ITR फाईल करण्यास प्रोत्साहित केले जाते.'

25 जुलै 2022 पर्यंत 3 कोटी ITR दाखल करण्यात आले

मूल्यांकन वर्ष (AY) 2023-24 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. 3 कोटींहून अधिक ITR आधीच दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीचा आकडा आतापर्यंत त्याने ओलांडला आहे.

यापूर्वी 25 जुलै 2022 पर्यंत 3 कोटी ITR दाखल करण्यात आले होते. पण यावेळी हा आकडा 19 जुलैलाच पार झाला. 18 जुलै 2023 पर्यंत दाखल केलेल्या 3.06 कोटी ITR पैकी 2.81 कोटी ITR ई-सत्यापित झाले आहेत.

जे एकूण फाइलिंगच्या 91% पेक्षा जास्त आहे. हे इलेक्ट्रॉनिक पडताळणी प्रक्रियेकडे करदात्यांची वाढती पसंती दर्शवते.

आयकर विभागाने ट्विट केले की, 'गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 7 दिवस आधी 3 कोटी आयकर रिटर्नचे (ITR) लक्ष्य गाठण्यात मदत केल्याबद्दल आमचे करदाते आणि कर व्यावसायिकांचे आभार!'

दुसरीकडे, अॅडव्होकेट्स टॅक्स बार असोसिएशन (एटीबीए) ने मागणी केली आहे की, अनेक राज्यांमधील पूरस्थिती लक्षात घेता, आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवावी.

देशातील पूरस्थिती पाहता करदात्यांच्या सोयीसाठी सरकारने या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली.

याशिवाय, कर व्यावसायिकांची देशातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी संघटना असलेल्या सेल्स टॅक्स बार असोसिएशननेही अर्थमंत्र्यांना पत्र लिहून आयटीआर भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT