Income Tax Return: खूशखबर! जुन्या कर प्रणालीतून ITR भरणाऱ्यांना मिळणार 'या' 6 महत्त्वाच्या सूट, जाणून घ्या

Income Tax News: फेब्रुवारीमध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी प्राप्तिकरातील बदलांची घोषणा केली होती.
Union FM Nirmala Sitharaman
Union FM Nirmala SitharamanDainik Gomantak
Published on
Updated on

Income Tax Return: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी प्राप्तिकर भरणाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यावेळी फेब्रुवारीमध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी प्राप्तिकरातील बदलांची घोषणा केली होती.

पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत 6 प्रकारच्या सूटचा लाभ मिळत आहे. यासह, नवीन कर प्रणालीमध्ये, तुम्हाला 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कर सवलतीचा लाभ मिळत आहे.

33,800 रुपयांची बचत होईल

दरम्यान, 7 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न (Income) असलेल्या करदात्यांना अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून नवीन आयकर प्रणाली अंतर्गत सूट वाढवल्यानंतर करात 33,800 रुपयांची बचत होईल.

Union FM Nirmala Sitharaman
Income Tax Return Filing FY 2022-23: सरकारने बदलले नियम! 31 जुलैपर्यंत ITR भरला नाही तर...

फायदे

नवीन कर प्रणालीमध्ये काही फायदे आहेत, परंतु त्यात कोणत्याही गुंतवणुकीवर सूट नाही. तथापि, नवीन कर प्रणालीमध्ये स्टॅंडर्ड डिडक्शनला निश्चितपणे जोडण्यात आले आहे.

दुसरीकडे, जर तुम्हाला गुंतवणूक (Investment) किंवा इतर सूट हवी असेल तर तुम्हाला जुन्या कर प्रणालीनुसार कर भरावा लागेल. जुन्या कर प्रणालीमध्ये अनेक सवलती उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत...

या सवलती जुन्या कर प्रणालीमध्ये उपलब्ध असतील -

1. स्टॅंडर्ड डिडक्शन- पगारदार व्यक्तींसाठी, 50000 रुपयांच्या सूटचा लाभ उपलब्ध असेल.

2. कलम 80 CCD (1B) - NPS खात्यात जमा केलेल्या रकमेसाठी 50,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त वजावट उपलब्ध असेल.

3. कलम 80TTA - हा विभाग एखाद्या व्यक्तीसाठी किंवा HUF साठी बँक, सहकारी संस्था किंवा पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यातून व्याज उत्पन्नावर जास्तीत जास्त 10,000 रुपयांची वजावट प्रदान करतो.

4. कलम 80D - हे आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर कपात करण्यास परवानगी देते.

5. कलम 80G - पात्र ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांना दिलेल्या देणग्या वजावटीसाठी पात्र आहेत.

6. कलम 80C - EPF आणि PPF, ELSS, जीवन विमा प्रीमियम, गृह कर्ज परतफेड, SSY, NSC आणि SCSS मध्ये गुंतवणूक करा आणि सूट मिळवा.

Union FM Nirmala Sitharaman
Income Tax Return Filing: इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मोठी भेट, आता रिफंडमध्ये मिळणार जास्त पैसे मिळणार; अर्थमंत्र्यांनी दिली माहिती!

सिलेक्ट न केल्यास नवीन कर प्रणालीचा भाग असेल

करदात्यांना 31 जुलै 2023 पर्यंत त्यांचा आयकर भरावा लागेल. दरम्यान, तुम्ही नवीन आणि जुनी कर प्रणालीपैकी कोणतीही निवड न केल्यास, नवीन कर प्रणाली अंतर्गत तुमचा TDS कापला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com