PM Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax: मोदी सरकारचा मोठा आदेश, या लोकांना भरावा लागणार 30 टक्के कर; मिळणार नाही 'ही' सूट

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास सुरुवात झाली आहे. ज्या लोकांचे उत्पन्न करपात्र आहे, त्यांना आयकर भरणे बंधनकारक आहे.

Manish Jadhav

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास सुरुवात झाली आहे. ज्या लोकांचे उत्पन्न करपात्र आहे, त्यांना आयकर भरणे बंधनकारक आहे.

सध्या, दोन वेगवेगळ्या कर प्रणालीनुसार आयकर भरला जातो. एक म्हणजे जुनी आयकर व्यवस्था आणि दुसरी नवीन आयकर व्यवस्था.

तर या वेळेपासून नवीन आयकर व्यवस्था ही डीफॉल्ट व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत नवीन आयकर प्रणालीतून कर भरताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

कर व्यवस्था

2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात (Budget) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक घोषणा केल्या. या घोषणांद्वारे, आयकर प्रणालीतील बदलांची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आणि त्यासोबतच नवीन आयकर प्रणालीमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन आयकर प्रणाली अंतर्गत कर भरला तर तुम्हाला 30% कर देखील भरावा लागेल.

आयकर

वास्तविक, नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर स्लॅब बदलण्यात आले आहेत. या अंतर्गत 3 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

यानंतर 3 ते 6 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के कर भरावा लागेल. त्याचबरोबर 6 ते 9 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 10 टक्के कर भरावा लागेल. यानंतर 9 ते 12 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 15 टक्के कर भरावा लागेल.

गुंतवणुकीवर सवलत नाही

यानंतर, जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 12-15 लाख रुपये असेल तर अशा लोकांना 20 टक्के कर भरावा लागेल.

दुसरीकडे, जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा लोकांना 30 टक्के कर भरावा लागेल. त्याचवेळी, नवीन कर प्रणालीतून कर भरताना, करदात्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, या प्रणालीमध्ये कोणत्याही गुंतवणुकीला (Investment) सूट दिली जाणार नाही.

सवलत मिळेल

जर करदात्याला त्याच्या गुंतवणुकीवर सूट मिळवायची असेल, तर त्याला जुन्या कर प्रणालीनुसार आयकर विवरणपत्र भरावे लागेल, तरच त्याला त्याच्या गुंतवणुकीवर कर भरताना सूट मिळू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT