FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax: दरमहा 87,500 रुपये कमवत असाल तर..., अर्थमंत्र्यांनी बदलले नियम!

FM Nirmala Sitharaman: तुम्हीही टॅक्स भरत असाल तर आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. जर तुमचा पगार 10.5 लाख रुपये असेल तर तुम्ही या पगारावर 100% टॅक्स देखील वाचवू शकता.

दैनिक गोमन्तक

FM Nirmala Sitharaman on Income Tax Deduction: आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही टॅक्स भरत असाल तर आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. जर तुमचा पगार 10.5 लाख रुपये असेल तर तुम्ही या पगारावर 100% टॅक्स देखील वाचवू शकता. होय... इतक्या उत्पन्नावरही तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. तुम्ही कर कसा वाचवू शकता ते जाणून घ्या...

2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

तुमचे 2.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न (Income) करमुक्त आहे, परंतु एवढे करुनही तुम्हाला 10.5 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर कर भरावा लागणार नाही.

50,000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन उपलब्ध आहे

जर कोणत्याही व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 10 लाख 50,000 रुपये असेल, तर तुम्हाला 50,000 रुपयांची सरळ स्टॅंडर्ड डिडक्शन मिळते. या स्थितीत तुमचे करपात्र उत्पन्न 10 लाख रुपये होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार या बजेटमध्ये स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपयांवरुन 70,000 रुपयांपर्यंत वाढवू शकते.

80C अंतर्गत 1.5 लाख सूट दिली जाईल

या सर्व व्यतिरिक्त, तुम्ही आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट घेऊ शकता. यात एलआयसी (LIC), पीपीएफसह अनेक सुविधा येतात. त्यानुसार तुमचे करपात्र उत्पन्न फक्त रु.8,50,000 उरते.

येथे 2 लाखांची सूट मिळेल

तुम्ही एखादे घर घेतले असेल किंवा तुमच्या नावावर गृहकर्ज असेल तर तुम्हाला आयकर सवलतीचा लाभही मिळतो. आयकर कायदा 24B अंतर्गत, तुम्हाला 2 लाखांपर्यंत पूर्ण सूट मिळते. त्यामुळे यानुसार तुमचे करपात्र उत्पन्न केवळ 6 लाख रुपये राहील.

विमा उतरवून तुम्हाला 75,000 रुपयांची सूट मिळू शकते

याशिवाय, तुम्ही आयकर कलम 80D अंतर्गत 75,000 रुपयांचा दावा करु शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी विमा देखील घेऊ शकता. असे केल्याने तुमचे करपात्र उत्पन्न केवळ 5 लाख 25 हजार रुपये कमी होईल.

येथे 25,000 रुपयांची सूट मिळेल

या सर्व व्यतिरिक्त, जर तुम्ही कोणत्याही संस्थेशी संबंधित असाल तर, तुम्हाला देणगीद्वारे 25,000 रुपयांपर्यंत कर सूट देखील मिळू शकते. यामध्ये तुम्ही कराच्या कलम 80G अंतर्गत दावा करु शकता. या सूटचा लाभ घेतल्यानंतर, तुमचे करपात्र उत्पन्न फक्त 5 लाख रुपये राहते, ज्यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT