Income Tax Return Dainik Gomantak
अर्थविश्व

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिफंडबाबत मोठी अपडेट, आयकर विभागाने 'या' लोकांकडे...

Income Tax Return: ज्या लोकांचे उत्पन्न करपात्र आहे त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरणे फार महत्वाचे आहे.

Manish Jadhav

Income Tax Return: ज्या लोकांचे उत्पन्न करपात्र आहे त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरणे फार महत्वाचे आहे. लोकांना दरवर्षी आयकर रिटर्न भरावे लागतात.

त्याचवेळी, जेव्हा लोक आयकर रिटर्न (Income Tax Return) भरतात आणि जर लोक आयकर परताव्यासाठी पात्र असतील, तर त्यांना आयकर परतावा देखील मिळतो. मात्र, यावेळी अद्यापही काही लोकांना आयकर परतावा मिळाला नसल्याने लोक आयकर परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान, आयकर विभागाने एक महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. चला तर मग त्या अपडेटबद्दल जाणून घेऊया...

आयकर रिटर्न

आयकर विभागाने (Income Tax Department) शनिवारी करदात्यांना 2022-23 या आर्थिक वर्षातील परताव्याच्या जलद निपटाराकरिता मागील वर्षांच्या थकबाकीच्या मागण्यांबाबत विचारलेल्या माहितीला प्रतिसाद देण्यास सांगितले आहे.

काही करदात्यांनी सोशल मीडियावर मागील प्रलंबित टॅक्स मागण्यांबाबत आयकर विभागामार्फत माहिती मागविण्याबाबत लिहिले, त्यानंतर विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देखील प्रतिसाद दिला.

आयकर

आयकर विभागाने म्हटले आहे की, "हे पाऊल करदात्यांच्या कल्याणासाठी आहे, जिथे त्यांना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार संधी दिली जात आहे." विभागाने सांगितले की, 2022-23 या आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नासाठी 7.09 कोटी रिटर्न भरले आहेत.

यापैकी 6.96 कोटी ITR सत्यापित केले गेले आहेत आणि 6.46 कोटी रिटर्न्सवर प्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये 2.75 कोटी रिफंड रिटर्नचाही समावेश आहे.

आयकर विभाग

"तथापि, अशी काही प्रकरणे आहेत, ज्यात करदात्यांना परतावा देय आहे परंतु मागील मागण्या पूर्ण झाल्या नाहीत," असे आयकर विभागाने सांगितले.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अद्याप परतावा मिळाला नसेल, तर आयकर विभागाने मागवलेल्या माहितीला उत्तर देऊन परतावा प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: आरोग्यमंत्री राणेंनी घेतली फडणवीसांची भेट; विजयाबद्दल केले अभिनंदन

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

Corgao: सरपंच निवड हा पंचायतीचा विषय! कोरगाववासीय नाईक यांच्या पाठीशी; धार्मिक वादाला विरोध

Her Story Her Screen महिला सबलीकरणाला समर्पित! IFFI चे सकारात्मक पाऊल

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

SCROLL FOR NEXT