In terms of Internet users, villages beat cities, the number of Internet users in india is more than 80 crores Dainik Gomantak
अर्थविश्व

Internet Users च्या बाबतीत खेड्यांची शहरांवर मात, देशातील इंटरनेट यूजर्स 80 कोटींच्या पुढे

Internet Users In India: या अहवालानुसार ९० टक्के ग्राहक दररोज इंटरनेट वापरतात आणि सरासरी दीड तास ऑनलाइन घालवतात. मोठी गोष्ट म्हणजे आता इंटरनेट यूजर बेसचा वाढीचा दर मंदावला आहे.

Ashutosh Masgaunde

India has more internet users in villages than cities:

देशातील इंटरनेट यूजर्सची संख्या 80 कोटींच्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या शहरी भागापेक्षा खेड्यांमध्ये अधिक आहे.

देशातील इंटरनेट यूजर्सपैकी 86 टक्के म्हणजे 70.7 कोटी लोक OTT ऑडिओ आणि व्हिडिओ सेवांचा आनंद घेतात. इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) आणि KANTAR यांनी तयार केलेल्या ‘इंटरनेट इन इंडिया रिपोर्ट 2023’ मध्ये हे उघड झाले आहे.

या अहवालानुसार ९० टक्के ग्राहक दररोज इंटरनेट वापरतात आणि सरासरी दीड तास ऑनलाइन घालवतात. मोठी गोष्ट म्हणजे आता इंटरनेट यूजर बेसचा वाढीचा दर मंदावला आहे.

देशभरातील इंटरनेट यूजर्सची संख्या दरवर्षी ८.८ टक्के दराने वाढली आहे. अनेक वर्षांपासून इंटरनेट वापराच्या वाढीचे इंजिन असलेले ग्रामीण क्षेत्र आता मंदावत आहे आणि वार्षिक आधारावर 11 टक्क्यांनी घट नोंदवत आहे.

2023 मध्ये इंटरनेट यूजर्सची एकूण संख्या 82 कोटींवर पोहोचेली. याचा अर्थ गेल्या वर्षी ५५ टक्क्यांहून अधिक भारतीयांनी इंटरनेटचा वापर केला.

या काळात ग्रामीण भागात ४४.२ कोटी लोकांनी इंटरनेटचा वापर केला. हे एकूण ग्राहकसंख्येच्या 53 टक्क्यांहून अधिक आहे.

नेट कॉमर्स, डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन शिक्षण यासारख्या इंटरनेट क्रियाकलाप शहरी भागात अधिक प्रचलित असल्याचे आढळून आले, तर बहुतेक लोक ओटीटी, कम्युनिकेशन, सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमसाठी इंटरनेट वापरत होते.

अहवालानुसार, इंटरनेटचा सर्वाधिक वापर ६२.१ कोटी ग्राहकांनी संवादासाठी केला आणि त्यानंतर ५७.५ कोटींनी सोशल मीडियासाठी केला.

स्मार्ट टीव्ही, स्मार्ट स्पीकर, फायरस्टिक्स, क्रोमकास्ट आणि ब्ल्यू-रे इत्यादी अपारंपरिक उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे डिजिटल मनोरंजन सेवांना चालना मिळाली आहे.

राष्ट्रीय स्तरावर, 2021-23 मध्ये या अपारंपरिक उपकरणांचा वाढीचा दर 58 टक्क्यांच्या दरम्यान राहिला आहे.

या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे नवीन पिढीतील लोकांची केबल किंवा फोन लाईन कापण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण, पहिल्यांदाच 20.8 कोटी लोक इंटरनेटवर व्हिडिओ वगैरे पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT