Passenger Trains Ticket Rate: लोकसभा निवडणुकीपूर्वी पॅसेंजर गाड्यांचे तिकीट दर 50 टक्क्यांनी घटले

Railway Ticket Price Cut: पॅसेंजर गाड्यांशिवाय कोणत्याही गाड्यांच्या भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व एक्स्प्रेस, सुपरफास्ट आणि वंदे भारत गाड्यांचे भाडे मात्र, तेच असणार आहे.
Ticket prices of passenger trains reduced by 50 percent.
Ticket prices of passenger trains reduced by 50 percent.Dainik Gomantak
Published on
Updated on

Ticket prices of passenger trains reduced by 50 percent:

लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. प्रवासी रेल्वेचे तिकीट दर रेल्वेने कोविडपूर्व कळात असलेल्या दरांइतके कमी केले आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे प्रवासी रेल्वेचे भाडे 40 ते 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

प्रवासी रेल्वे 'एक्स्प्रेस स्पेशल' आणि 'मेमू/डेमू एक्सप्रेस' रेल्वे म्हणून ओळखल्या जातात. आता या गाड्यांचे द्वितीय श्रेणीचे भाडे पूर्ववत करण्यात आले आहे.

या बदलाची अधिसूचना रेल्वे अधिकाऱ्यांनी मुख्य बुकिंग आरक्षण पर्यवेक्षकांनाही जारी केली आहे.

यानंतर, ज्या मेमू गाड्यांचा क्रमांक शून्याने सुरू होतो. त्यांचे भाडे 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. 27 फेब्रुवारीपासून देशभरात हा बदल लागू झाला आहे.

Ticket prices of passenger trains reduced by 50 percent.
Small Cap Mutual Fund बाबत कोटक महिंद्राने घेतला कठोर निर्णय, गुंतवणूकदारांवर थेट परिणाम

कोरोना महामारीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी सरकारने पॅसेंजर गाड्यांचे भाडे एक्स्प्रेस गाड्यांइतके वाढवले होते.

यासोबतच प्रवासी गाड्याही टप्प्याटप्प्याने थांबवण्यात आल्या होत्या. त्यांची जागा स्पेशल एक्स्प्रेस आणि मेमू गाड्यांनी घेतली होती.

Ticket prices of passenger trains reduced by 50 percent.
ICICI Bank: '13 कोटींहून अधिक रुपयांचा फ्रॉड', ICICI बँकेच्या बॅंक मॅनेजरवर महिलेचा मोठा आरोप; बॅंकेने सांगितले...

या बदलामुळे गाड्यांचे किमान भाडे 10 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आले होते. अशा परिस्थितीत, कोरोनामुळे प्रवासी पॅसेंजर गाड्यांऐवजी एक्स्प्रेस गाड्यांचे भाडे देत होते. कोरोनाचा काळ संपल्यानंतर प्रवाशांकडून प्रवासी गाड्यांचे भाडे कमी करण्याची मागणी होत होती, ती आता सरकारने पूर्ण केली आहे.

पॅसेंजर गाड्यांशिवाय कोणत्याही गाड्यांच्या भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व एक्स्प्रेस, सुपरफास्ट आणि वंदे भारत गाड्यांचे भाडे मात्र, तेच असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com