Airtel Down Dainik Gomantak
अर्थविश्व

दिल्ली-कोलकातामध्ये ब्रॉडबँडसह मोबाइल नेटपर्यंत सेवा ठप्प

दिल्ली, जयपूर, कोलकाता यांसारख्या देशातील अनेक शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

दिल्ली, जयपूर, कोलकाता यांसारख्या देशातील अनेक शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन झाले आहे. सोशल मीडियावर एअरटेलचे नेटवर्क बंद झाल्याच्या तक्रारी यूजर्स सातत्याने करत आहेत अश्यातचं ट्विटरवर #AirtelDown ट्रेंडींग मध्ये आहे. सोशल मीडियावर वापरकर्ते म्हणतात की त्यांना मोबाईल इंटरनेट आणि कॉलिंगमध्ये समस्या येत आहेत.

अनेक वापरकर्त्यांनी ब्रॉडबँडच्या समस्यांबाबतही तक्रार केली, वापरकर्त्यांचा दावा आहे की एअरटेल थँक्स अॅप देखील काम करत नाही. DownDetector च्या मते, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन झाले आहे.

एअरटेलने ट्विट करून आउटेजची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की, 'आमच्या इंटरनेट सेवांमध्ये तात्पुरते व्यत्यय आले आणि तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता सर्व काही सामान्य झाले आहे, कारण आमचे कार्यसंघ आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी अथकपणे परिश्रम घेत आहेत.

गेल्या आठवड्यात मुंबई सर्कलमध्ये जिओचे नेटवर्कही डाऊन झाले होते, मुंबईत रिलायन्स जिओची सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुंबई सर्कलमधील अनेक भागातील वापरकर्त्यांना कॉल करणे किंवा इंटरनेट वापरणे शक्य नव्हते, गेल्या चार महिन्यांत जिओ सेवा मुंबईत ठप्प होण्याची ही दुसरी वेळ होती. अनेक युजर्सनी जिओ फायबरमधील समस्यांबाबतही त्यावेळी तक्रार केली होती. जिओने मुंबई सर्कलमध्ये आपले नेटवर्क बंद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT