LIC IPO Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC IPO मुळे तोटा झाला तर सरकार गुंतवणुकदारांसाठी तयार करणार प्लॅन B

कंपनी या महिन्यात आपला पहिला तिमाही निकाल प्रसिद्ध करेल आणि त्यात गुंतवणूकदारांसाठी लाभांश देखील जाहीर केला जाणार आहे असे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

सरकारी विमा कंपनी (Government Insurance Company) एलआयसीच्या आयपीओला खूप हायअप मिळाला आहे, पण बॅंकेची कामगिरी काही खास राहिलेली नाही. सुरुवातीला कंपनीचे शेअर्स सवलतीच्या दरात लिस्ट करण्यात आले आहेत, आणि त्यानंतर त्याची किंमत सातत्याने घसरत गेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे. आता LIC च्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कंपनी या महिन्यात आपला पहिला तिमाही निकाल प्रसिद्ध करेल आणि त्यात गुंतवणूकदारांसाठी लाभांश देखील जाहीर केला जाणार आहे असे सांगण्यात आले आहे. (In case of loss due to LIC IPO the government will prepare a plan for investors)

पहिल्या तिमाहीचा निकाल 'या' दिवशी येणार

एलआयसीने बीएसईला सांगितले की ते 30 मे रोजी पहिले तिमाही निकाल जाहीर करतील, आणि त्यात असेही म्हटले आहे की ते 30 मे रोजी मार्च तिमाहीसाठी लेखापरीक्षित आर्थिक निकालांवर विचार करेल आणि मंजूर देखील करेल. याशिवाय गुंतवणूकदारांना इन्वेस्टर्स द्यायचा असेल तर तोही 30 मे रोजी मंजूर केला जाईल.

स्टॉक सध्या इश्यू किमतीपेक्षा एवढा खाली आहे

मंगळवारी एलआयसीचा शेअर दिवसभराच्या व्यवहारात बीएसईवर 1.59 टक्क्यांच्या वाढीसह 829.85 रुपयांवर व्यवहार करत होता पण तो अजूनही इश्यू किमतीपेक्षा 12.55 टक्क्यांनी कमी झाला आहे. LIC IPO साठी किंमत 902-949 रुपये निश्चित करण्यात आली होती. जवळपास 9 टक्के सूट देऊन कंपनीचा शेअर बाजारात लिस्ट झाला आहे. LIC च्या IPO चा आकार रु. 20,557 कोटी होता आणि तो 2.95 पटीने सबस्क्राइब केला होता. सध्या कंपनीचे एमकॅप रु एवढा 5,24,626.93 कोटी आहे.

त्यामुळे बंपर लाभांश अपेक्षित आहे

शेअरच्या किमतीत घसरण झाल्यानंतरही एलआयसीच्या गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो, असे विश्लेषकांनी सांगतले आहे. गेल्या वर्षीही कंपनीने लाभांश दिलेला नाहीये. LIC चे 25 टक्के शेअर्स विकण्याची सरकारची योजना आहे आणि IPO मधून फक्त 3.5 टक्के स्टेक विकला जाऊ शकतो, सरकार आगामी काळात FPO देखील आणू शकते. गुंतवणूकदारांनी एफपीओ हातात घेणे आवश्यक आहे, जे आयपीओमध्ये पैसे ठेवतात त्यांना नफा भेटणे देखील आवश्यक आहे. यामुळे, LIC च्या गुंतवणूकदारांना बंपर लाभांश मिळण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT