LIC Policy Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC पॉलिसीधारकांसाठी महत्वाची बातमी, आजच करा 'ही' कामे

LIC पॉलिसीधारकांसाठी ते सरकारी पेन्शनधारक आणि करदात्यासाठी महत्वाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

LIC पॉलिसीधारकांसाठी ते सरकारी पेन्शनधारक आणि करदात्यासाठी महत्वाची बातमी आहे. उद्या फेब्रुवारी महिना संपत आहे, त्यापूर्वी काही महत्वाचे काम करावे लागेल, अन्याथा नंतर त्रास होऊ शकतो. वास्तविक, सरकारी निवृत्तीवेतनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे, एलआयसी (LIC) पॉलिसीधारकांच्या पॉलिसीशी पॅन (Pan Card) लिंक करणे आणि करदात्याच्या आयटीआर पडताळणीसाठी उद्या 28 फेब्रुवारी 2022 ही अंतिम मुदत आहे. म्हणजेच या तिन्ही गोष्टी करण्याची संधी आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

* सरकारी पेशनर्स वेटनधारकाना जीवन प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.

जर तुम्हीही निवृत्तीधारक असाल तर उद्यापर्यंत तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा नंतर अडचणी वाढतील. जीवन सन्मान पत्र सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे. यापूर्वी जीवन प्रमानपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 दिसेबर 2021 होती, ती वाढवून 28 फेब्रुवारी करण्यात आली आहे. सरकारी पेन्शनधारकाने कोणत्याही व्यत्ययाशिवाय निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी दरवर्षी त्याचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या आधारावर तुम्हाला पुढील वर्षी पेन्शन मिळते.

* LIC पॉलिसीधारक पॅन कार्ड करावे लिंक

जर तुम्हाला मार्च महिन्यात होणाऱ्या LICच्या IPO मध्ये भाग घायचा असेल, तर त्यापूर्वी तुम्हाला तुमची LICपॉलिसी PAN Card शी 28 फेब्रुवारीपर्यंत लिंक करावी लागेल. अन्यथा तुम्हाला LICच्या IPOमध्ये उपलब्ध असलेली विशेष सुविधा मिळणार नाही. LICच्या IPO मध्ये 31 कोटी 62 लाख 49 हजार 885 शेअर्स विकले जाणार आहेत. हा हिस्सा LIC च्या 5 % स्टेक सारखा आहे. 10 % IPO म्हणजेच 3.16 कोटी शेअर्स एलआयसी पॉलिसीधारकांसाठी राखीव असतील.

* करदात्यांची ITR पडताळणी करावे

करदात्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. तुम्ही मूल्यांकन वर्ष 2020-2021 साठी प्राप्तिकर रिटर्न भरला असेल, परंतु अद्याप पडताळणी करण्यात सक्षम नसेल, तर लगेच तुमचा आयटीआर सत्यापित करावे. कारण ITR पडताळणीची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे. यामुळे 28 फेब्रुवारीपर्यंत तुमचा ITR पडताळणी न झाल्यास तो अवैध मनाला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT