एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खाते असेल तर, ही बातमी एकदा वाचा  Dainik Gomantak
अर्थविश्व

एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खाते असेल तर, ही बातमी एकदा वाचा

एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खाते (Bank Accounts) असल्यास तुम्हाला अनेक नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

जर तुमचे अनेक बँकांमध्ये खाते (Accounts) असेल तर तुम्हाला सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. एकापेक्षा अधिक बँक खाते (Bank Accounts) असल्यास तुम्हाला अनेक नुकसान होऊ शकते. यात झालेल्या आर्थिक नुकसानाची माहिती मिळत नाही. कर (Tax) आणि गुंतवणूक (Investments) तज्ञांच्या मते एकाच बँकेत खाते (Bank Accounts) असल्यास टॅक्स रिटर्न फाइल करणे सोपे होते.

अनेक बँकांमध्ये खाते असल्याने प्रत्येक बँकेचे अकाऊंट मेंटनस चार्ज , डेबिट कार्ड चार्ज, एसएमएस चार्ज, सर्विस चार्ज, किमान शिल्लक शुल्क, असे अनेक शुल्क भरावे लागतात. यात आर्थिक नुकसान आहे. जर अकाऊंट बॅलेन्स मेंटेन न ठेवल्यास बँक भरमसाठ शुल्क आकारतात. यामुळे अधिक बँकमध्ये असलेले खाते बंद करावे.

अकाऊंटमध्ये असलेल्या पैशांचे कॅल्कुलेशन करणे किचकट होते. यामुळे इनकम टॅक्सच्या कॅल्कुलेशनमध्ये चूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला इनकम टॅक्सकची नोटिस येवू शकते. ही समस्या सोडवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी या अर्थसंकल्पात नवीन प्रणालीची घोषणा केली होती. नवीन नियमानुसार पगारांच्या उत्पन्नाव्यतिरिक्त इतर स्त्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्न, जसे डिविडेंड इनकम, कॅपिटल गेन इनकम, बँक डिपॉजिट इंट्रेस्ट इनकम , पोस्ट ऑफिस इंट्रेस्ट इनकमची माहिती आधीच भरलेली असेल. आतापर्यंत कर दात्यांना त्याचे स्वतंत्र्यपणे कॅल्कुलेशन करावे लागत होते. जर तुम्ही कॅल्कुलेशन करायला विसरले तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता ही संपूर्ण माहिती पॅन कार्डच्या मदतीने मिळते.

जर तुमचे सेव्हींग अकाऊंट किंवा करंट अकाऊंट एका वर्षापेक्षा अधिक काळ वापरले नाही तर तुमचे खाते इनअॅक्टिवेट होते. अशा खात्यामुळे फसवणुक होण्याची शक्यता अधिक असते. बँकेच्या म्हणण्यानुसार ज्यांचे अकाऊंट अॅक्टिव्ह असते अकाऊंटसोबत अंतर्गत आणि बाह्य फसवणुकीची शक्यता सर्वाधिक असते.अशावेळी त्याचे डिटेल वेगळ्या खात्यात ठेवले जातात.

जर तुमचे अनेक बँकांमध्ये खाते असेल तर त्या बँकेच्या नियमानुसार किमान शिल्लक रक्कम तुमच्या बँक अकाऊंटमध्ये असणे आवश्यक आहे. कारण याचा परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर पडतो. ज्या पैशांवर तुम्हाला किमान 7-8 टक्के परतावा मिळाला पाहिजे,ते पैसे तुमचे किमान शिल्लक म्हणून ठेवले जातील. असे नाही की किमान शिल्लकवर व्याज उपलब्ध नाही,परंतु ते जास्तीत जास्त 3-4 टक्क्यापर्यंत असेल. हे पैसे योग्य ठिकाणी गुंतवून करून 7-8 टक्केपर्यंत परतावा सहज मिळू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT