Epfo Dainik Gomantak
अर्थविश्व

EPF खात्यात नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करा ते ही ऑनलाइन, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

एखाद्या कंपनीची नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत जॉइन होत असाल तर तुम्ही स्वतःच बाहेर पडण्याची तारीख EPF खात्यात अपडेट करू शकता. या सुविधेचा फायदा तेच लोक घेऊ शकतात,ज्यांनी त्यांचा UAN ला आधारशी लिंक केले आहे.

दैनिक गोमन्तक

आजकाल नोकरदार वर्ग एका कंपनी मधून दुसऱ्या कंपनी मध्ये जातात. त्यामूळे अनेकांच्या मनात EPF संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आता गोंधळून जाण्याचे कारण नाही आणि यासाठी तुम्हाला EPFO (Epfo) ​​कार्यालयात जाण्याची सुध्दा गरज नाही. जर तुम्ही एखाद्या कंपनीची नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत जॉइन होत असाल तर तुम्ही स्वतःच बाहेर पडण्याची तारीख EPF च्या खात्यात अपडेट करू शकता. आणि ते ही ऑनलाइन घरी बसून करता येते. ईपीएफओने ट्विट च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

ईपीएफओने आपल्या सदस्यांना सांगितले आहे की, ते त्यांच्या स्वतःच्या कंपनीतून (Company)बाहेर पडण्याची तारीख ऑनलाइन अपडेट करू शकतात. कर्मचार्‍यांना हे कसे करावे यासाठी ईपीएफओने ट्विटमध्ये एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही बाहेर पडण्याची तारीख देखील अपडेट करू शकता.

ईपीएफओने एफएक्यूमध्ये (FAQ) याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. ईपीएफओने म्हटले आहे की, जर तुम्ही दुसऱ्या कंपनीत नोकरी जॉईन करत आहे आणि पीएफ ट्रान्सफर करायचा असेल तर त्यापूर्वी जुन्या कंपनीतून नोकरी सोडण्याची तारीख ईपीएफ खात्यात अपडेट करावी लागेल. याचा कालावधी हा नोकरी सोडल्यानंतर फक्त दोन महिन्यांसाठीच अपडेट करता येते. तुम्ही नोकरी सोडत असलेल्या महिन्याच्या कोणत्याही तारखेस तुम्ही EPF खाते अपडेट करू शकता.

तारीख अपडेट करण्याची ही सुविधा जो मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे त्या मोबाईल (Mobile) नंबरवर प्राप्त झालेल्या OTP(Otp) वरून करता येते. या सुविधेचा फायदा तेच लोक घेऊ शकतात ज्यांनी त्यांचा UAN अॅक्टिवेट केला आहे व UAN ला आधारशी लिंक केले आहे. जर मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तर ईपीएफचा ओटीपी त्याच नंबरवर जाईल आणि त्याच ओटीपीच्या मदतीने नोकरी सोडण्याची तारीख अपडेट केली जाऊ शकते.

जाणून घ्या नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करण्याची प्रक्रिया

स्टेप 1- मेंबर सेवा पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ पर यूएएन और पासवर्ड से लॉगिन करें

स्टेप 2- मेंबर सेवा पोर्टलवर https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ UAN आणि पासवर्डसह लॉग इन करा.

स्टेप 3- Manage बटणावर क्लिक करा आणि मार्क एक्झिट वर क्लिक करा, नंतर रोजगार ड्रॉपडाऊन निवडून पीएफ खाते क्रमांक निवडा.

स्टेप 4- बाहेर पडण्याची तारीख आणि नोकरी सोडण्याचे कारण लिहून एंटर करा

स्टेप 5- नंतर रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करा आणि आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबर वर मिळालेला ओटीपी एंटर करा

स्टेप 6- चेक बॉक्स निवडा आणि अपडेट वर क्लिक करा व नंतर ओके वर क्लिक करा.

यानंतर, तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल ज्यामध्ये, तुम्ही मागील कंपनीमधून नोकरी सोडण्याची तारीख यशस्वीरित्या अपडेट केली आहे असे दिसेल. आवश्यकता वाटल्यास, आपण बाहेर पडण्याची तारीख अपडेट केली आहे की नाही हे देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला सदस्य ई-सेवा पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.

स्टेप 1 - View या मेनूवर जा आणि service history यावर सिलेक्ट करा.

स्टेप 1- तुमच्या स्क्रीनवर एक नवीन टॅब उघडेल. यात एक यादी उघडेल ज्यामध्ये कोणत्या कंपनीत काम केले आहे आणि पीएफ खाते चालले आहे हे दिसेल. ईपीएफमध्ये जॉइन होण्याची तारीख, ईपीएफ सोडण्याची तारीख, ईपीएसमध्ये जॉइन होण्याची तारीख इत्यादींची माहिती सुध्दा उपलब्ध असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT