Tata Play offer OTT services
Tata Play offer OTT servicesDainik Gomantak

उद्यापासून सुरू होणार Tata Playचा कॉम्बो पॅक

OTT सेवा ऑफर करण्यासाठी Tata Skyने बदलले नाव, देणार Netflix, Amazon Prime Video, Disney+Hotstarचा कॉम्बो पॅक
Published on

टाटा स्कायने (Tata Sky) आपले नाव बदलून टाटा प्ले (Tata Play) असे नवे नाव दिले आहे. कंपनीला आपल्या पॅकेजमध्ये टेलिव्हिजन-कम-ओटीटीवर आपला विस्तार करायचा आहे. डायरेक्ट-टू-होम प्लॅटफॉर्मने नेटफ्लिक्सला त्याच्या 13 OTT सेवांमध्ये जोडले आहे, आणि Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar देखील या पॅकमध्ये समाविष्ट केले आहेत. 27 जानेवारीपासून सुरू होणार्‍या टाटा कंपनीच्या रु. 399 प्रति महिना कॉम्बो पॅकची जाहिरात अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान आणि दक्षिणेतील आर माधवन आणि प्रियामणी यांच्याद्वारे केली जाणार आहे.

Tata Play offer OTT services
शेयरहोल्डर्सला नफा देण्यात Tata ग्रुप आघाडीवर

टाटा प्लेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ हरित नागपाल यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “आम्हाला हे समजले आहे की बरेच लोक अजूनही टेलिव्हिजन पाहत असताना, ते OTT देखील पाहत आहेत. वेगवेगळ्या कंटेंटच्या शोधात असलेले लोकं वेगवेगळे अॅप वापरतात यामुळे त्यांचे आर्थिक बजेटही वाढते. आमची नवीन ब्रँड ओळख या कल्पनेशी सुसंगत आहे की आम्ही आता फक्त डीटीएच प्लेयर नाही तर लाइव्ह टेलिव्हिजन आणि ओटीटी सेवांवर देखील कंटेंन्ट देतो."

सेवेबद्दल अधिक तपशीलवार माहिती देताना, नागपाल यांनी या नवीन ऑफरचे कौटुंबिक उत्पादन म्हणून वर्णन केले आहे. नागपाल म्हणाले की, "जेव्हा एकाच कुटुंबातील वेगवेगळे सदस्य टीव्ही पाहत नाहीत, तेव्हा हा कॉम्बो पॅक त्यांना त्यांच्या आवडीचा मजकूर मोबाइल फोन किंवा मोठ्या स्क्रीनवर पाहता येइल. प्लॅनच्या किमती स्क्रीनच्या संख्येनुसार, DTH कनेक्शन आणि सदस्यता घेतलेल्या पॅकनुसार बदलतील."

Tata Play offer OTT services
Air Indiaची मालकी पुन्हा TATA कंपनीकडे?

व्हिजिट चार्ज

याव्यतिरिक्त, टाटा प्लेने 175 रुपयांचा सर्व्हिस व्हिजिट चार्ज काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या डीटीएच ग्राहकांनी त्यांचा पॅक रिचार्ज केला नाही ते देखील विनामूल्य री-कनेक्शन मिळवू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com