ITR Dainik Gomantak
अर्थविश्व

सावधान! आत्तापर्यंत ITR भरला नसेल तर...

आर्थिक वर्ष 2020-21 (AY 2021-22) साठी आयकर रिटर्न भरण्याची पहिली अंतिम तारीख 31 जुलै 2021 होती परंतु नंतर ती 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली.

दैनिक गोमन्तक

आर्थिक वर्ष 2020-21 (AY 2021-22) साठी आयकर रिटर्न भरण्याची पहिली अंतिम तारीख 31 जुलै 2021 होती परंतु नंतर ती 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. यानंतर, आयकर विभागाने माहिती दिली की, 31 डिसेंबरपर्यंत ई-फायलिंग पोर्टलवर 5.89 कोटी आयकर (Income tax) रिटर्न भरले गेले. आता जर तुम्ही या लोकांमध्ये असाल तर चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्ही दिलेल्या वेळेत तुमचा ITR भरु शकला नसाल, तर जाणून घ्या या गोष्टी. (If You Do Not File Your ITR By The Due Date You May Be Sent To Jail)

दरम्यान, तुम्ही 31 डिसेंबर 2021 पर्यंत तुमचा ITR दाखल करु शकला नसाल आणि अद्याप तो दाखल केला नसेल, तर आता तुमच्याकडे 31 मार्च 2022 पर्यंत फाइल करण्याची वेळ आहे. परंतु, यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. उशीरा फाइल करणाऱ्यांना विलंबाची भरपाई करण्यासाठी दंड शुल्क भरावे लागते. कर तज्ज्ञ बलवंत जैन (Balwant Jain) यांनी यावेळी सांगितले की,'जर व्यक्तीचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असेल, तर त्याला/तिला ITR भरताना अनिवार्यपणे 5,000 रुपये दंड शुल्क भरावे लागेल. मात्र, ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.'

बलवंत जैन पुढे म्हणाले, 'पाच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी हा दंड एक हजार रुपये आहे. जैन यांच्या मते, तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत तुमचा आयटीआर दाखल केला नाही तर मात्र त्रास वाढू शकतो.'

ते पुढे म्हणाले की, ''31 मार्च 2022 नंतरही तुम्ही आयटीआर दाखल न केल्यास, आयकर विभाग तुमच्यावर 50 टक्क्यांपर्यंतचा दंड आकारु शकतो, जो तुम्हाला आयटीआर न भरुन लपवायचा होता किंवा टाळायचा होता. याशिवाय तुरुंगातही जाऊ शकते.''

बलवंत जैन म्हणाले की, 'अशा परिस्थितीत सरकारला तुमच्यावर खटला चालवण्याचा अधिकार आहे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमचा ITR देय तारखेपर्यंत दाखल केला नाही, तर तुम्हाला तुरुंगातही पाठवले जाऊ शकते.'

youtube.com/watch?v=fgoTgzs6DSg

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT