IDBI बँकेने नुकतीच 3 ऑगस्ट 2021 रोजी देशभरातील शाखांमध्ये कार्यकारी पदांच्या एकूण 920 रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  Dainik Gomantak
अर्थविश्व

बँकेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे

आयडीबीआय बँकेत (IDBI Bank) कंत्राटी तत्त्वावर कार्यकारी पदांवर अर्ज करण्यास पात्र आहेत ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून किमान 55% गुणांसह कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केली आहे.

दैनिक गोमन्तक

जर तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल (Looking for a job in a bank) तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. IDBI बँकेने नुकतीच 3 ऑगस्ट 2021 रोजी देशभरातील शाखांमध्ये कार्यकारी पदांच्या एकूण 920 रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने (On a contractual basis) भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (Application process) सुरू झाली आहे. यासाठी शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 आहे. जे उमेदवार आयडीबीआय बँकेत कार्यकारी भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत, ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही, ते बँकेच्या अधिकृत वेबसाइट, idbibank.in वर ऑनलाइन अर्ज भरून अर्ज करू शकतात.

तसेच, उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की ऑनलाईन अर्जादरम्यान, बँकेने निर्धारित केलेल्या 1000 रूपयांचे अर्ज शुल्क देखील भरावे लागेल, जे ते ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. ज्या उमेदवारांनी 18 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर केलेले असतील, त्यांना 2 सप्टेंबर 2021 पर्यंत त्या अर्जाची प्रिंट मिळू शकतील.

कोण अर्ज करू शकतो?

फक्त तेच उमेदवार आयडीबीआय बँकेत कंत्राटी तत्त्वावर कार्यकारी पदांवर अर्ज करण्यास पात्र आहेत ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून किमान 55% गुणांसह कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केली आहे. 1 जुलै 2021 रोजी त्यांचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गांसाठी (एससी, एसटी, ओबीसी, दिव्यांग आणि इतर) यांच्या वयोमर्यादेत शिथिलता आहे.

सहाय्यक व्यवस्थापक होण्याची संधी

आयडीबीआय बँक 920 कार्यकारी पदांची कंत्राटी तत्वावर भरती करणार आहे. या कराराचा कालावधी 3 वर्षांचा असेल, परंतु बँकेने या कालावधीच्या समाप्तीनंतर सहाय्यक व्यवस्थापक (ग्रेड ए) च्या पदांवर कायमस्वरूपी नियुक्तीची तरतूद केली आहे. तथापि, त्यासाठी बँकेकडून निवड प्रक्रिया केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'मै दिल्लीमे था, हमे कुछभी मालूम नहीं'! नाईटक्लब दुर्घटनेप्रकरणी जामीन मंजूर झाल्यावर संशयिताची प्रतिक्रिया

"नाईटक्लबच्या दुर्घटनेतील बळी ही तर देशाची हानी"! न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केला शोक; ड्रग्जपासून दूर राहण्याचे तरुणांना केले आवाहन

Drug Menace in Goa: ड्रग्जविरोधात ‘झिरो टॉलरन्स’! CM सावंतांचा कडक इशारा; ड्रग्जमुक्त गोवा घडवण्यासाठी एकत्र येण्याचे केले आवाहन

Konkan Tourism: गोव्याची क्रेझ संपली? पर्यटकांची पावलं आता कोकणाकडे; सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे किनारे 'हाऊसफुल्ल'

Bollywood Big Releases 2026: धुरंधर काहीच नाही! 2026 मध्ये बॉलिवूडचा धमाका; 'धर्मेंद्र' यांचा शेवटचा सिनेमा होणार 1 जानेवारीला प्रदर्शित

SCROLL FOR NEXT