Paytm मध्ये 20,000 पदांची नोकर भरती

डिजिटल पेमेंट(Digital Payment) आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएम(Paytm) ने आपल्या कंपनीमध्ये आता बंपर भरती काढली आहे(Job Openings In Paytm).
Paytm Recruitment of 20,000 posts
Paytm Recruitment of 20,000 posts Dainik Gomantak

डिजिटल पेमेंट(Digital Payment) आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएम(Paytm) ने आपल्या कंपनीमध्ये आता बंपर भरती काढली आहे(Job Openings In Paytm). पेटीएम आता संपूर्ण भारतभर सुमारे 20,000 सेल्समनची नियुक्ती करणार आहे.देशातील छोट्या व्यापाऱ्यांना(MSME) डिजिटल माध्यमाचा अवलंब करण्याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी ही नियुक्ती केली जाणार आहे.पेटीएमने या नोकरीची जाहिरात दिली असून ज्यात म्हटले आहे की फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह्ज (FSE) ला मासिक पगार आणि कमिशनमध्ये 35,000 रुपये आणि त्याहून अधिक कमावण्याची उत्तम संधी आहे. कंपनीला तरुण पदवीधरांना एफएसई म्हणून नियुक्त करायचे आहे. (Paytm Recruitment of 20,000 posts)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार “पेटीएमने एफएसईची नियुक्ती सुरू केली आहे. ही संधी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी 10 वी, 12 वी उत्तीर्ण केली आहे किंवा जे लोक पदवीधर आहेत. यामुळे लहान शहरांमध्ये रोजगार मिळण्यास मदत होणार आहे ज्याची मदत विशेषत: ज्यांनी आपली नोकरी कोरोना काळात गमावली आहे.

Paytm Recruitment of 20,000 posts
आर्थिक वर्षात बँकांनी बाजारातून उभारले 58,700 कोटी रुपयांचे भांडवल

यातून कंपनीला जास्तीत जास्त महिलांना प्रोत्साहन द्यायचे आहे जेणेकरून महिला व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंटबद्दल शिक्षण देण्यास मदत होणार आहे.

पेटीएम आपल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना भरघोस ऑफर सुद्धा देत आहे ज्यात पेटीएम व्यापाऱ्यांना बक्षीस देण्यासाठी गॅरंटीड कॅशबॅक ऑफर देण्यात येणार आहे. तसेच त्यांना साउंडबॉक्सेस आणि आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) उपकरणे देखील ऑफर करत आहे, ज्याचा फायदा एफएसई घेऊ शकतो.

दैनंदिन जीवनात पेटीएमचा वापर करणाऱ्या दोन कोटींपेक्षा जास्त व्यापाऱ्यांच्या सुधारणेचे लक्ष्य ठेवून कंपनीने या वर्षी कार्यक्रमासाठी 50 कोटी रुपये वचन दिले आहेत. डेटा फर्म रेडसीरच्या मते, पेटीएमचे सकल व्यापारी मूल्य (GMV) सुमारे 4 लाख कोटी रुपये आहे, जे पेमेंट उद्योगात सर्वाधिक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com