Bike Maintenance Tips Dainik Gomantak
अर्थविश्व

Bike Maintenance Tips: भर रस्त्यात जर गाडीला द्यावा लागला धक्का, तर वापरा 'या' ट्रिक्स

बाईक चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाईकच्या पार्टबद्दल थोडीतरी माहीती असणे आवश्यक आहे.

Puja Bonkile

Bike Maintenance Tips: बाईक चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाईकच्या पार्टबद्दल थोडीतरी माहीती असणे आवश्यक आहे. कारण भर रस्त्यामध्ये जर बाईक बंद पडली तर तुम्हाला काय करायचे आहे हे समजेल. 

अनेकवेळा असे देखील घडते की बाईक चालवताना अचानक बंद पडते आणि पुन्हा पुन्हा सुरू करूनही ती सुरू होत नाही. जर तुमच्यासोबत असे घडले तर काय करावे याबद्दल आम्ही तुम्हाला काही खास ट्रिक्स सांगणार आहोत.

जर तुमच्यासोबत असे कधी झाले असेल तर सर्वात पहिले बाईकचे पेट्रोल संपले आहे का ते तपासावे. जर नसेल तर स्पार्क प्लग एकदा तपासावे. कारण अनेकवेळा लूज स्पार्क प्लगमुळे बाइक सुरू होत नाही.

  • स्पार्क प्लग म्हणजे काय?

बाईकच्या इंजिनच्या वरच्या बाजूला पांढरा रंगाचा स्पार्क प्लग असतो. जे खुप वेळा सैल होते. ते इंजिनला पूर्णपणे कनेक्शन देऊ शकत नाही आणि बाइक सुरू होत नाही. 

त्यामुळे तुमची बाईक सुरू होत नसेल तर सर्वात पहिले स्पार्क प्लग काढा आणि कापडाने स्वच्छ करा आणि नीट बसवा. त्यानंतर तुम्ही बाइक एकदा स्टार्ट करून पाहावी.

Bikes

अनेकवेळाअसे होते की लोक बाईक बंद करण्यासाठी इंजिन स्वीच वापरतात आणि विसरुन जातात. नंतर पुन्हा बाईक स्टार्ट करण्यासाठी गेल्यावर ती सुरू होत नाही आणि वारंवार किक किंवा सेल्फी मारून स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतात. जर तुमची बाईक सुरू होत नसेल तर एकदा बाजूला लाल रंगात दिलेला इंजिन स्विच तपासावा आणि बाईक सुरु करुन पाहावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT