Fastag Dainik Gomantak
अर्थविश्व

फास्टॅगद्वारे भरू शकता 'हा' कर, 'या' बँकेने सुरू केली सुविधा

दैनिक गोमन्तक

पर्यटन विकास परिषद मनाली, हिमाचल प्रदेश आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेने फास्टॅगचा वापर करून ग्रीन टॅक्स भरण्यास सुरुवात केली आहे. देशात ग्रीन टॅक्स (Tax) भरण्यासाठी फास्टॅग शिल्लक रकमेचा वापर पहिल्यांदाच केला जात आहे. मनालीतील वाहनधारकांसाठी अशी देयके कॅशलेस व सोयीची करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सध्या फास्ट टॅग चा वापर टोल, ईंधन आणि पार्किंग शुल्क भरण्यासाठी फास्टॅग बॅलेन्सचा वापर करण्यात येत आहे. पर्यटन विकास परिषद मनालीने आयडीएफसी (IDFC) फर्स्ट बँकेची (Bank) अधिग्रहण बँक म्हणून निवड केली आहे. हिमाचल प्रदेशला दर महिन्याला 50 लाख पर्यटक भेट देतात.

या भागीदारीबद्दल बोलताना आयडीएफसी फर्स्ट बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. मधिवनन म्हणाले की, ट्रांजिट संबंधित देयकांचे डिजिटायझेशन करण्याच्या क्षेत्रात भारत सध्या एका नवीन आघाडीवर आहे. बँकेने म्हटले आहे की, वाहनधारकांसाठी देयके सुलभ आणि वेगवान करण्यासाठी त्यांनी सातत्याने फास्टॅग विकसित केले आहेत. त्यांनी फास्टॅगचा वापर करून इंधन आणि पार्किंगच्या पेमेंटसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानाचा विस्तार वाढविला आहे. निवेदनात म्हटले आहे की, ग्रीन टॅक्स भरण्यासाठी प्रथमच फास्टॅग सुरू करण्यासाठी पर्यटन विकास परिषद मनालीबरोबर भागीदारी करण्यात त्यांना आनंद होत आहे, ज्यामुळे ते कॅशलेस झाले आहे. त्यामुळे थांबण्याचा वेळ कमी होईल आणि मनालीमध्ये वाहनधारकांना सहज क्रॉस ओव्हर मिळेल.

बँकेने जारी केले 60 लाख फास्टॅग

आयडीएफसी फर्स्ट बँक आज 400 हून अधिक टोल प्लाझाची सेवा देणारी सर्वात मोठी अधिग्रहणकर्ता आहे आणि सुमारे 60 लाख फास्टॅग जारी केले आहेत. टॅगचा वापर करून वाहनधारकांकडून दररोज सरासरी 20 लाख रुपयांचा व्यवहार केला जातो, असेही बँकेने म्हटले आहे. इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL), नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांचे जिल्हा प्रशासन कुल्लू आणि टीडीसी मनाली यांच्याशी सुरळीत व्यवहार सुलभ करण्यासाठी ग्रीन टॅक्स वसुलीसाठी फास्टॅग सुविधा सुरू करणे हा एक उपक्रम आहे, अशी माहिती डीसी कुल्लू, आशुतोष गर्ग यांनी दिली. हे मानवी इंटरफेस कमी करते आणि वेळ वाचवते तसेच डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहित करते.

सर्व राष्ट्रीय महामार्ग प्लाझावर टोल भाडे स्वीकारण्याचे साधन म्हणून नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI), इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी संयुक्तपणे फास्टॅग कार्यक्रम सुरू केला. दिवसाला सुमारे 70 लाख व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या या इको-सिस्टिममध्ये बँका इश्यूजर आणि अॅग्रीव्हर्स म्हणून काम करतात. सर्व राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझा आणि निवडलेल्या राज्य महामार्गांवर फास्टॅग स्वीकारले जातात. सक्रिय टोल प्लाझाची नवीनतम संख्या सुमारे 900 आहे.

आयडीएफसी फर्स्ट बँक ही एक अधिग्रहण करणारी बँक आहे आणि सुमारे 412 टोल प्लाझा आणि 15 पार्किंगच्या ठिकाणी फास्टॅगद्वारे देय देण्यास सक्षम करते. व्यावसायिक वाहन क्षेत्रात फास्टॅगचा वापर करण्यात बँक आघाडीवर असून लांब पल्ल्याच्या ट्रकसाठी हा पसंतीचा टॅग आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

का साजरा करतात 'World Heart Day'? हृदयविकारांचे प्रकार आणि 'कोरोना'नंतर वाढलेल्या शस्त्रक्रियांमागची कारणे जाणून घ्या

FC Goa: 'हेर्रेरा'ची सामन्यानंतरही दिलदार कामगिरी! ईस्ट बंगालच्या चाहत्यांप्रती केला 'असा' आदर व्यक्त; म्हणाला की..

Goa Recruitment: सुवर्णसंधी! तरुणांनो लागा तयारीला, 'या' सरकारी विभागात होणार मेगा भरती

Mandrem Panchayat: मांद्रेत डोंगरकापणी रोखणार! नवनिर्वाचित सरपंचांचा विश्वास

Margao News: पावसामुळे कोकण रेल्वे उड्डाणपुलावरील रस्ता परत खराब! नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची लोकांची मागणी

SCROLL FOR NEXT