Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Privatization: महागड्या दराने सरकार विकणार ही बॅंक, तुमचे खाते आहे का?

Bank Privatization: देशात खासगीकरणावर सरकार वेगाने काम करत आहे.

दैनिक गोमन्तक

Bank Privatization: देशात खासगीकरणावर सरकार वेगाने काम करत आहे. अनेक कंपन्यांच्या निविदाही येऊ लागल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची प्रक्रियाही जवळपास सुरु झाली आहे. बँकिंग रेग्युलेशन कायद्यात सुधारणा करुन सरकार PSU बँकांवरील (PSBs) विदेशी मालकीवरील 20% मर्यादा काढून टाकणार आहे. या क्रमाने, सरकार प्रथम आयडीबीआय बँकेतील आपला हिस्सा विकत आहे.

सरकारची योजना

केंद्र सरकार (Central Government) आयडीबीआय बँक महागड्या दराने विकण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, सरकार सरकारी मालकीच्या आयडीबीआय बँक लि.चे सुमारे 640 अब्ज रुपये किंवा $7.7 अब्ज मिळवण्याच्या तयारीत आहे. असे जर झाल्यास सरकारच्या हिश्श्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री असेल. विशेष म्हणजे, केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मिळून IDBI बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विकणार आहेत. दुसरीकडे, ब्लूमबर्ग न्यूजच्या या वृत्ताची बातमी पसरताच आयडीबीआय बँकेचे शेअर्स शुक्रवारी 3% वाढले.

सरकार खासगीकरणाकडे वाटचाल करत आहे

चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 22 मध्ये IDBI बँकेसह दोन सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली होती. याशिवाय, NITI आयोगाने खाजगीकरणासाठी दोन PSU बँकांची निवड केली आहे. यासोबतच चालू आर्थिक वर्षात एक विमा कंपनी विकली जाईल, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले होते.

या बँकांचे खासगीकरणही होऊ शकते

एका अधिकाऱ्याने सांगितले की, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांची खाजगीकरणासाठी संभाव्य उमेदवार म्हणून निवड करण्यात आली होती. म्हणजेच, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचे खाजगीकरण केले जाऊ शकते. त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्रही या यादीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deepti Sharma: दीप्ती शर्मा रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारी ठरणार पहिली भारतीय; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा रेकॉर्डही धोक्यात

Bangladesh Violence: दीपू दासनंतर बांगलादेशात अमृत मंडलची जमावाकडून हत्या, घरे पेटवली, मंदिरे फोडली; हिंदूंवरील अत्याचाराचं सत्र सुरुच

चिंबलमध्ये जनआंदोलन भडकले! निसर्ग रक्षणासाठी लढा; युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ प्रकल्पाला विरोध

Chandra Gochar 2025: चंद्रदेवाची शतभिषा नक्षत्रात एन्ट्री! 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; नोकरीतील पदोन्नतीसह व्यवसायात होणार भरभराट

Goa Accident: शिवोली-मार्णा मार्गावर अपघाताचा थरार! चिरेवाहू ट्रकने दोन गाड्यांना उडवले, सुदैवाने जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT