Finance Minister Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Privatisation: 'या' कंपन्यांना विकणार ही सरकारी बँक, या आठवड्यात सादर होणार EoI...!

Bank Privatisation Latest News: बँकेच्या खाजगीकरणाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

Bank Privatisation Latest News: बँकेच्या खाजगीकरणाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी त्यांच्या अर्थसंकल्पात IDBI बँकेतील हिस्सा विकण्याची घोषणा केली होती. सध्या अर्थसंकल्पापूर्वी बँकांच्या खासगीकरणाच्या यादीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या बँकेसाठी अनेक कंपन्यांनी बोली लावली आहे.

या दोन कंपन्या स्वारस्य दाखवत आहेत

सध्या, एमिरेट्स एनबीडी ही मध्य पूर्व बँकिंग कंपनी आणि अब्जाधीश प्रेम वत्स यांच्या नेतृत्वाखालील कॅनडाचा फेअरफॅक्स ग्रुप, आयडीबीआय बँकेतील सरकारचा हिस्सा खरेदी करण्यात मोठा रस दाखवत आहेत.

EoI या आठवड्यात सादर केला जाऊ शकतो

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, Emirates NBD आणि Fairfax ग्रुप या बँकेतील हिस्सा खरेदी करण्यासाठी या आठवड्यात एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर करु शकतात.

दुसरी कंपनीही स्वारस्य दाखवत आहे

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्झेंबर्गची प्रायव्हेट इक्विटी कंपनी सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स देखील या डीलमध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी पुढे येऊ शकतात. सध्या तरी याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्याचा EOI सादर करण्याबाबत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.

सरकारचा वाटा काय

या बँकेत LIC आणि केंद्र सरकारची (Central Government) एकूण 94.71 टक्के हिस्सेदारी आहे, त्यापैकी सरकारची सुमारे 45 टक्के भागीदारी आहे. तर, उर्वरित भाग एलआयसीचा आहे. या खासगीकरणाच्या निर्णयानंतर सरकारकडे बँकेत फक्त 15 टक्के हिस्सेदारी राहणार आहे. मोदी सरकार आणि LIC मिळून IDBI बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विकणार आहेत. या स्टेकमधील गुणोत्तराबद्दल बोलायचे झाल्यास सरकारचे प्रमाण 30.48 टक्के आणि एलआयसीचे स्टेक 30.24 टक्के असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT