Hyundai Electric Vehicle Dainik Gomantak
अर्थविश्व

Electric Vehicle : सिंगल चार्जमध्ये धावणार 480 किमी; जाणून घ्या Hyundai च्या नव्या इलेक्ट्रिक कारचे अमेझिंग फिचर्स

Hyundai Motor India लवकरच भारतात एक नवीकोरी इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

आदित्य जोशी

Hyundai Motor India लवकरच भारतात एक नवीकोरी इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. कंपनीची बहुप्रतिक्षित Ioniq 5 भारतात लॉन्च होण्यास सज्ज असून या कारचं बुकिंग येत्या 20 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. Hyundai Ioniq 5 कोरोनानंतर कोरियाई कंपनीचं हे दुसरं इलेक्ट्रिक मॉडेल असेल. Hyundai Ioniq 5 आधीपासूनच पाश्चिमात्य देशांमध्ये विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध आहे.

ई-जीएमपी म्हणजेच इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म आर्किटेक्चरवर बनवण्यात आलेली Ioniq 5 कार 2 बॅटरीच्या पॅकसह बाजारात उपलब्ध आहे. RWD असेल किंवा AWD या दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये 58 kWh आणि 72.6 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. Hyundai Ioniq 5 ची रेंज प्रामुख्याने कारमध्ये देण्यात आलेल्या बॅटरीवर अवलंबून आहे. छोट्या 58 kWh बॅटरी पॅकसोबत Ioniq 5 जवळपास 385 किमीपर्यंत धावू शकते, तर 72.6 kWh बॅटरी पॅकसोबत जवळपास ही कार 480 किमी धावू शकते.

महत्त्वाची बाब म्हणजे या बॅटरीला 350 kW DC फास्ट चार्जरने 18 मिनिटांमध्ये 0 से 80 टक्के चार्ज केलं जाऊ शकतं. कंपनीने अद्याप भारतात ही कार कोणत्या बॅटरी पॅकसोबत लॉन्च होणार हे जाहीर केलेलं नाही. Ioniq 5 मध्ये बरेच प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यात 12.3 इंचाचा HD टचस्क्रीन मुख्य डिस्प्ले, दुसरा 12.3 इंचांचा ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, सनरुफ आणि लेदर सीट्स यासारख्या अनेक गोष्टी या कारमध्ये देण्यात आल्या आहेत. कारचं एक्टिरीअरही दुसऱ्या कोणत्याही ह्युंदाई कारपेक्षा वेगळं ठेवण्यात आलं आहे.

याच्या डिझाइनमध्ये LED डे टाईम रनिंग लॅम्प आणि एलईडी टेल लॅम्पसोबत LED हेडलॅम्पही देण्यात आला आहे. याशिवाय युरोपमध्ये 2021 च्या मॉडेलला 5 स्टार सेफ्टी रेटिंगही मिळालं आहे. एकदा अधिकृतपणे लॉन्च झाल्यानंतर Hyundai Ioniq 5 कार Kia EV6 आणि Volvo XC40 Recharge सोबत स्पर्धा करणार आहे. ह्युंदाई या कारला प्रतिस्पर्धी कार उत्पादकांच्या तुलनेत स्वस्त ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. Kia च्या EV6 या कारची किंमत 60 लाखांपासून पुढे ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा झालं महाग! पर्यटनाच्या नावाखाली लूट, 'कचऱ्याचे ढिग' आणि 'टॅक्सीवाल्यांची दादागिरी', पर्यटकाने शेअर केला धक्कादायक अनुभव

पिर्णा हत्या प्रकरण 15 तासांत उलगडले; कांदोळीतील मुख्य आरोपीला अटक

18 गुन्ह्यांचा रेकॉर्ड! गोवा-पुणे महामार्गावर 8 लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश; पोलिसांच्या वेशातील 'सराईत गुन्हेगार' जेरबंद

Valpoi Theft: ना CCTV, ना सेक्युरिटी, चोरट्यांनी गॅस कटरनं तोडली खिडकी; वाळपई पोस्ट ऑफिसमधून लाखो रुपये लंपास

'मी अशा पुरुषाच्या शोधात’; ऑनलाईन अश्लील जाहिरातीला बळी पडला अन् लाखो रुपये गमावले

SCROLL FOR NEXT