PF Benefits  Dainik Gomantak
अर्थविश्व

'एका तासात 1 लाख रुपये मिळवा' वाचा सविस्तर

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पैशांची तातडीने गरज असल्यास, पीएफ खातेधारक पीएफ खात्यातून एक लाख रुपयापर्यंत आगाऊ रक्कम काढू शकतात.

दैनिक गोमन्तक

सध्या देशात कोरोना विषणूचा प्रादुर्भाव (Corona) वाढत आहे. यामुळे अनेक लोक पुन्हा चिंतेत आले आहेत. कोरोना किंवा इतर कोणत्याही आजारांमुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले किंवा स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी पैसे हवे असतील तर पैसे (Money) कुठून येणार. केंद्र सरकारने अशा परिस्थितीसाठी लोकांना एक सुविधा दिली आहे, ज्याबद्दल त्यांना माहिती नाही. चला तर मग जाणून घेऊया. (how to withdraw pf for medical emergency)

एका तासात एक लाख रुपये कसे मिळवायचे हे जाणून घेवूया. तुम्ही आता तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून अर्जंट बेसवर एक लाख रुपये काढू शकता. 1 जून 2021 रोजी सरकारने एक परिपत्रक जारी केले होते की EPFO सदस्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून वैद्यकीय आणीबाणीसाठी पैसे (Money) काढायचे असतील तर ते 1 लाख रुपये काढू शकतात. पीएफमधून (PF) आंशिक पैसे काढने शक्य आहे.

कोणत्याही वैद्यकीय आणिबाणीच्या वेळी पीएफ खात्यातून 1 लाख रुपयापर्यंतचे वैद्यकीय आगाऊ पैसे काढता येतात. पीएफ मधून आगाऊ रक्कम काढल्यानंतर, ही रक्कम बँक खात्यात येण्याची वेळ 3 ते 7 दिवस होती,ती कमी करून 1 तास करण्यात आली. सरकारने जूनमध्ये नियम बदलले होते, जेणेकरून कोविड हॉस्पिटलायझेशनसह वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पीएफ खात्यातून 1 लाख रुपयापर्यंत पैसे काढता येतील.

या सुवेधेअंतर्गत तुम्हाला अर्ज करतांना कोणतेही बिल जमा करण्याची गरज नाही. तुम्हाला पीएफमधून वैद्यकीय आगाऊ अर्ज करवा लागेल आणि 1 तासात पैसे (Money) तुमच्या नोंदणीकृत बँक (Bank) खात्यात हस्तांतरित केले जातील. वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी पीएफमधून (PF) पैसे काढण्याची सुविधा यापूर्वी होती, परंतु यासाठी तुम्हाला बिले जमा करावी लागतील जी आता करायची नाहीत. रुग्णाच्या डिस्चार्जनंतर बिले आणि पावत्या या प्रक्रियेअंतर्गत सादर कराव्या लागतात.

पीएफमधून पैसे कसे काढण्यांची पद्धत

* www. epfindia. gov. in वेबसाईटच्या होम पेजवर, वरच्या उजव्या कोपऱ्यात ऑनलाइन अॅडव्हान्स क्लेमवर क्लिक करा.

* तुम्हाला https://unifiedportalem.epfindia.gov.in/memberinterface ही लिंक उघडावी लागेल.

*ऑनलाइन सेवांवर जा आणि त्यानंतर दावा (फॉर्म- 31, 19,10सी आणि 10 डी) भरावा लागेल.

* तुमच्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक प्रविष्ट करा आणि पडताळणी करा.

* Processed For Online Claim वर क्लिक करा.

* ड्रॉप डाउनमधून पीएफ अॅडव्हान्स निवडा (Form 31)

* आवश्यक रक्कम टाकावी आणि चेकची स्कॅन कॉपी आपलोड करा आणि तुमचा पत्ता टाकावा.

* Get Adhaar OTPवर क्लिक करावे. आणि आधार लिंक केलेल्या मोबाइलवर प्राप्त झालेला OTPटाइप करावा.

* तुमचा दावा दाखल केल्यानंतर आणि स्वीकारल्याच्या तासाभरात पीएफ दाव्यांचे पैसे येतील.

* 1 लाख रुपयापर्यंतचा पीएफ अॅडव्हान्स मिळवण्याशी संबंधित गोष्टी लक्षात ठेवाव्या.

ही वैद्यकीय आगाऊ रक्कम पीएफ खातेधारक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यासाठी असू शकते. रुग्णाला सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील युनिट किंवा CGHS पॅनेलवर सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयात दाखल केले पाहिजे . खाजगी रुग्णालयात दाखल केल्यास, संबंधित अधिकारी या प्रकाराकडे लक्ष देतील आणि त्यासाठी मागितलेल्या अर्जाचा विचार करून पीएफ आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी देईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

SCROLL FOR NEXT