LIC IPO Dainik Gomantak
अर्थविश्व

LIC चा IPO खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी

LIC चा IPO घेण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा

दैनिक गोमन्तक

तुम्हाला एलआयसीचा आयपीओ घ्यायचा असेल तर गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. हा आयपीओ होळीच्या आधी किंवा नंतर येवू शकतो. यामध्ये 10 टक्के हिस्सा विमाधारकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे, परंतु शेअर्स स्वस्तात मिळण्यासाठी विमाधारकाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही LIC चा IPO घ्यायचा असेल, तर तुम्हाला या 10 गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. (LIC IPO Latest Updates)

* हा जगातील विमा कंपनीचा तिसरा सर्वात मोठा IPO आहे. एसबीआय कॅपिटल, सिटी ग्रुप, नोमुरा, जेपी माॅर्गन आणि Goldanman Sachs यासह इतर पाच देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूक बँका IPO साठी बूक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

* LIC चा IPO च्या पाच टक्के कर्मचाऱ्यांसाठी आणि 10 टक्के विमाधारकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

* दोन्ही अर्ज एकाच डीमॅट खात्यातून केले असले तरीही ते वैध मानले जातील. विमाधारकांसाठी कोणताही लॉक-इन कालावधी नसेल आणि ते सूचीच्या दिवशी शेअर्स विकू शकतात.

* LIC च्या 26 कोटी विमाधारकांसाठी 3.16 कोटी शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत, परंतु केवळ विमाधारकच यासाठी अर्ज करू शकतात, ज्यांच्याकडे पॅन पॉलिसी लिंक्ड आणि डीमॅट खाते असेल.

* विमाधारकांचे स्वत:च्या नावावर डीमॅट खाते असावे. तसेच त्याने 28 फेब्रुवारीपर्यंत त्याच्या पॉलिसी रेकॉर्डमध्ये पॅन अपडेट करणे आवश्यक आहे. पॉलिसी 13 फेब्रुवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी जारी केलेली असावी.

* यासाठी गट विमा व्हॅलिड नाही. नॉमिनी आणि मृत पॉलिसीधारकांची वार्षिकी प्राप्त करणारा जोडीदार यासाठी अर्ज करू शकत नाही.

* PAN-LIC चे स्टेटस जाणून घेण्यासाठी

https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus ला भेट द्या. तुमचा पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन टाका. त्यानंतर कॅप्चा टाका आणि सबमिट करा.

* https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/ यावर पॅन अपडेट करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT