'आप'शिवाय कोणीही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करू शकत नाही: केजरीवाल

सत्ताधारी ,विरोधकांवर केला हल्ला; मये, पर्ये आणि सांताक्रुझ येथे जनसभेला केले संबोधित
Arvind Kejriwal
Arvind KejriwalDainik Gomantak
Published on
Updated on

Arvind Kejriwal: पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी काल (गुरुवारी) दुपारी गोव्यात आलेले आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपल्या धारदार शब्दात विरोधकांबरोबर आणि सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. भ्रष्टाचारी मार्गाने मंत्र्यांच्या खिशात जाणारा पैसा जनतेच्या सेवेसाठी वापरला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून केजरीवाल यांनी गुरुवारी मये, पर्ये आणि सांताक्रुझ येथे मोठ्या जनसभेला संबोधित केले. या सभेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. गोव्यावर 24 हजार कोटींचे कर्ज आहे, तरीपण शाळा-रुग्णालये बांधण्यासाठी एक पैसाही खर्च केला नाही. गेल्या 25-30 वर्षांत नवीन शैक्षणिक, आरोग्य सुविधा नाहीत, दर्जेदार रस्तेही बांधले गेले नाहीत. मग हा पैसा जातो कुठे? तर तो मंत्र्यांच्या खिशात जातो. गोवा लवकरच आपच्या रूपाने सर्वात प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारचे स्वागत करेल, असे ते म्हणाले

त्यांनी 'आप'ला मतदान केल्यास गोव्यात "भ्रष्टाचारमुक्त आणि प्रामाणिक" सरकार देण्याचे आश्वासन दिले आहे. केजरीवाल म्हणाले की, 'आप'च्या दिल्ली सरकारच्या ट्रॅक रेकॉर्डपहिले असता, जिथे दुकानदाराकडून लाच मागितल्याच्या आरोपावरून स्वतःच्या मंत्र्याला काढून टाकण्यात आले होते. (No one can create huge jobs without AAP Arvind Kejriwal)

Arvind Kejriwal
ज्या वेगाने पंतप्रधानांचं हेलिपॅड बनलं, त्याच वेगाने गोव्याचा विकास करु : केजरीवाल

लाच घेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होईल

मंत्री किंवा आमदार लाच मागताना आढळल्यास त्यांना शासन होईल. आम्ही क्षुल्लक पातळीवरील भ्रष्टाचारही थांबवू. दिल्लीत सरकारी अधिकारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी अर्जदाराच्या निवासस्थानी भेट देतात, आणि गोव्यातही अशीच प्रणाली सुरू केली जाईल. तुमच्या पंचायतीच्या कामापासून ते मुख्यमंत्र्यांच्या मदतीपर्यंत सर्व काही तुमच्या दारात असेल."

खाणकाम पुन्हा सुरू करणार, गोव्याला 'आप'ची हमी

राज्यातील खाण (Goa Mining) क्षेत्राबाबत ते म्हणाले की, यात अनेकांचे व्यक्तिगत स्वार्थ आहेत. “खाणकाम पुन्हा सुरू करणे अशक्य नाही पण ते पुन्हा सुरू व्हावे, असे सध्याच्या सरकारला वाटत नाही. आमचा हेतू पवित्र आहे. आमचे सरकार हे सुनिश्चित करेल की खाणकाम सहा महिन्यांत पुन्हा सुरू होईल आणि तोपर्यंत, प्रत्येक अवलंबून असलेल्या कुटुंबाला 5,000 रुपये मासिक भत्ता दिला जाईल.

गोव्याला जमिनीचे हक्क देण्यासाठी अवघे 6 महिने लागतील

केजरीवाल यांनी असेही सांगितले की, सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आम आदमी पार्टीचे सरकार ज्यांना अनेक दशकांपासून जमिनीचे हक्क मिळाले नाहीत, त्यांना जमिनीचे हक्क उपलब्ध करून देईल. गोवा हे वीज-अतिरिक्त राज्य असूनही, किनारपट्टीच्या राज्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील 35 लाख कुटुंबांना आप सरकारमध्ये “शून्य वीज बिल” मिळत आहे.

'आप'शिवाय कोणीही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करू शकत नाही

आमच्या पक्षाने दिल्लीत 10 लाख तरुणांना रोजगार दिला आहे. जर तुम्हाला रोजगार हवा असेल, तर 'आप'ला मतदान करा कारण आम्ही एकमेव पक्ष आहोत जो रोजगार निर्माण करू शकतो. जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही दरमहा 3000 रु. रुपये बेरोजगारी भत्ता देऊ.

सर्व महिलांना 1000 रुपये, गृह आधारसाठी 2500 रुपये दिले जातील

नवी दिल्ली प्रमाणेच, त्यांनी आप सत्तेत आल्यास मोफत तीर्थयात्रा, मोफत वैद्यकीय सेवा आणि उत्तम रस्ते आणि शिक्षण पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, 'आम्ही सरकार स्थापन केल्यावर, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक महिलेला 1000 रुपये मासिक भत्ता मिळेल आणि गृह आधार भत्ता 1500 वरून 2500 पर्यंत वाढवला जाईल'.

सत्तेच्या नशेत असलेल्या राजकारण्यांची राजवट संपवण्याची वेळ: अमित पालेकर

'आप'चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि सांताक्रुझचे उमेदवार अॅडव्होकेट अमित पालेकर (Amit Palekar) म्हणाले, 'काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी घेतलेले सांता क्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी 90 कोटींची विकासकामे केल्याचा दावा केला आहे. त्यांनी कोणत्या प्रकारचा विकास केला याची मला उत्सुकता आहे. कारण या भागात अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे.'

सांताक्रुझमध्ये भाजप सरकारच्या विरोधात एक मजबूत अँटी-इन्कम्बन्सी अस्तित्वात आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी भाजपने काँग्रेस उमेदवार रुडॉल्फ फर्नांडिस यांच्याशी गुप्त करार केला आहे. फर्नांडिस यांनी काँग्रेसच्या बॅनरखाली सांताक्रुझची जागा जिंकताच ते दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये सामील होतील आणि त्यांना सरकार स्थापन करण्यास मदत करतील अस ते या सभेत म्हणाले

'सांताक्रुझचा गेल्या 25 वर्षांपासून कोणताही विकास झालेला नाही. सांताक्रूझ गावात बाजारपेठेसाठी ग्रामस्थांची प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झालेली नाही. सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असल्याने, सांताक्रुझ शहराचा विकास झाला आहे. पुरेशी वाहतूक कनेक्टिव्हिटी नाही. प्रमुख बसस्थानकांची दुरवस्था झाली आहे. सांताक्रुझ येथे अखंड पाणी आणि वीजपुरवठा या मूलभूत सुविधांचाही अभाव आहे.

Arvind Kejriwal
आमदार अपात्रता याचिकेवरील निकाल न्यायालयाने ठेवला राखून

आप मयेचे उमेदवार राजेश कळंगुटकर म्हणाले, '1961 मध्ये गोवा मुक्त झाला असताना, मये अद्याप मुक्त झालेला नाही. मये मतदारसंघाला तीन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. त्यात वाढता बेरोजगारीचा दर, पायाभूत सुविधांचा अभाव आणि जमिनीची मालकी यांचा समावेश आहे'. पुढे ते म्हणाले, 'अरविंद' म्हणजे कमळ मयेमध्‍ये आणखी एक कमळ आहे कोणत्या कमळाचा आधार घ्यायचा हे जनतेने ठरवायचे आहे. दीर्घकाळ भ्रष्ट असलेले कमळ की प्रामाणिक प्रशासन देणारे कमळ.

ह्या निवडणुकीत अत्यंत चढा-ओढ पाहायला मिळत आहे.शेवटी त्यांनी जनतेला व्यवस्थित विचार करून 'आप'ला बहुमत देण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com